सोलापूर – पुण्याहून सोलापूरकडे दुचाकीवरून येत असताना सोलापूर-पुणे महामार्गावर अरण (ता. माढा) गावाजवळ मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात सोलापूरातील तिघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. तिघे मित्र एकाच दुचाकीवरून जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. Triple-seat travel on a two-wheeler is expensive; Unfortunate death of three friends in Solapur Temburni Police
अज्ञात वाहनचालकावर अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जोग हे करीत आहेत.
हा अपघात काल बुधवारी मध्यरात्री उशीरा घडला. अपघातात मरण पावलेले तिघेही मित्र भवानी पेठ परिसरातील असून या घटनेमुळे भवानीपेठेवर शोककळा पसरली आहे. अपघात मरण पावलेले तिघेजण एकाच मोटारसायकलवरुन पुण्याहून परतत होते.
तेजस सुरेश इंडी (वय २०) व लिंगराज शिवानंद हाळके (वय २४, दोघे रा. भवानी पेठ) यांचा या अपघातात गंभीररित्या जखमी होवून जागेवरच मृत्यू झाला तर तिसरा मित्र गणेश शरणप्पा शेरी यांचा उपचार सुरु असताना सोलापुरातील शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार तेजस इंडी हा पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो ट्रेनने पुण्याला जाणार होता; मात्र लिंगराज हाळके आणि गणेश शेरी यांनी दुचाकीवरून जाऊ असा निर्णय घेतला. एकाच दुचाकीवरून ट्रीपलसीट जाण्याचा निर्णय चुकीचा ठरला व तिघा मित्रांना अपघातात जीव गमवावा लागला.
मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान ते सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ असलेल्या अरण गावच्या हद्दीत वरवडे नाका येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. पोलिसांच्या गस्ती पथकास गस्त घालत असताना हा अपघात झाल्याच दिसून आलं. या अपघातात जागेवरच दोघांचा मृत्यू झाला होता. पोलीसांनी तिसऱ्या जखमीस उपचारासाठी तात्काळ सोलापूरच्या सिव्हीलला हॉस्पिटलकडे पाठवलं, मात्र त्याचाही उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
या घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात झाली असून या अपघातात तीन तरुण मित्रांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने भवानीपेठ भागावर शोककळा पसरली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर । महिला डॉक्टरचा विनयभंग, आईलाही मारहाण
□ घरात घुसून मारहाण; चार तोळ्याचे दागिनेही काढून घेतले
सोलापूर : घरजागा नावावर करून देण्याच्या कारणावरून डॉक्टर महिला व तिच्या आईला मारहाण करून डॉ. महिलेशी लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदला आहे. ही घटना अक्कलकोट रोड, गांधीनगर झोपडपट्टी येथे घडली.
यातील फिर्यादी महिला ही डॉक्टर असून, तिचा पती इंजिनिअर आहे. ते इमाम बावली, लाल दरवाजा, हैदराबाद येथे वास्तव्यास असतात. फिर्यादीमध्ये डॉक्टर महिलेने म्हटले आहे की, काही दिवसांपासून अक्कलकोट रोड, गांधीनगर झोपडपट्टी येथे आईसोबत राहण्यास आली आहे. ही जागा तिने १२ नोव्हेंबर २०२० मध्ये रीतसर खरेदी करून आई व मोठ्या भावाच्या नावे केली आहे. ती जागा भावाची बायको स्नेहा हिच्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावत होती.
२५ एप्रिल रोजी फिर्यादी आईसमवेत गांधीनगर येथील घरात असताना तिची वहिनी व तिची आई गेटचे कुलूप तोडून आत आले. तिच्याजवळचे साहित्य घरात ठेवून दोघांना मारहाण केली.
स्नेहा रविराज सोलगी, उमा माशाळे, पूजा माशाळे, अक्षय माशाळे, अतुल माशाळे, अतुल व त्याचा मित्र, नीता, स्वप्निल दुधाळे, नवनाथ, नारायण माशाळकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी पीडितेच्या मुख्य दरवाजा व खिडकी तोडून घरात घुसून तू येथून निघून जा नाहीतर तुझा जीव घेईन, असे म्हणून त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन काढून घेतली. तसेच त्यांच्या हातातील एक तोळ्याचे ब्रासलेटही जबरदस्तीने काढून घेतले. अक्षय व स्वप्नील या दोघांनी गच्ची पकडून त्यांच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तक्रार देण्यासाठी पोलिसात गेले असता उपचारासाठी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशीही पुन्हा आलेल्या जमावाने मारहाण केली. यातील दोघांनी पीडित महिलेशी लज्जास्पद वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास फौजदार राजपूत करीत आहेत.