सोलापूर – मोदी परिसरातील सोनी नगरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. A young woman who was studying pharmacy in Soni Nagar committed suicide by hanging herself in Solapur
शुभांगी पुंडलिक फुलारी (वय १९ रा. सोनीनगर, हुडको) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास तिची आई आणि भाऊ हे दोघे बँकेत गेले होते. ती घरात एकटी असताना देवघरातील खोलीत छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतली होती.
भाऊ शुभम याने तिला फासातून सोडवून शासकीय रुणालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वी मयत झाली. मयत शुभांगी फुलारी ही डीफार्मसीचे शिक्षण घेत होती. तिच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. तिची आई शिक्षिका तर वडील रिक्षाचालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही. महिला हेडकॉन्स्टेबल शितल चव्हाण या पुढील तपास करीत आहेत.
● दाळमिलमध्ये बंगालच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – मुळेगावतांडा (ता.दक्षिण सोलापूर) येथील रामदेव दाल मिलच्या आवारात पश्चिम बंगाल येथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली .
लक्ष्मीनारायण मन्दु मारडी (वय १८ रा. धनसला प.बंगाल) असे मयताचे नाव आहे. पहाटे दोन वाजण्याच्या पूर्वी त्याचा मृतदेह रामदेव दाल मिलच्या आवारात असलेल्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार सय्यद पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● बालाजी मंदिराजवळ तलवारीने मारहाण
सदर बझार परिसरातील बालाजी मंदिराजवळ भांडण सोडविण्यास गेले असता तलवार आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत अनिल हिरासिंग कजाकवाले (वय ५० रा.लोधी गल्ली हे जखमी झाले . ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली . त्यांना उपचारासाठी सुमन (पत्नी) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले . त्यांना अजय चौधरी, किरण मदनावाले आणि इतर दोन जणांनी मारहाण केली. अशी नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे .
○ वरवडे येथे अपघात; पादचारी वृद्ध ठार
पुणे महामार्गावरील वरवडे (ता.माढा ) येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने उत्तम निवृत्ती वजाळे (वय ७५ रा.वरवडे) हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. हा अपघात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. ते शेतातून पायी घराकडे निघाले होते. त्यावेळी पुणे ते सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अनोळखी वाहनाच्या धडकेने हा अपघात घडला. अशी नोंद टेंभुर्णी पोलिसात झाली. फौजदार पवार पुढील तपास करीत आहेत.
○ बाळे येथे रिक्षा अपघात ३ जखमी
एसटी स्टँड ते पाकणी येथे रिक्षातून जात असताना टाटा शोरूम जवळ पिकपच्या धडकेने रिक्षामधील राहुल जगन्नाथ शेटे (वय २२ रा.नांदेड), आदिनाथ कालिदास गोडसे (वय ५७ रा.पेनुर) आणि रतन भोसले (वय ४३) असे तिघेजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी रतन भोसले याची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे .
● उमरगा अपघात ;जखमी महिलेचा मृत्यू
बलसुर ते उमरगा मार्गावर टमटमच्या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुक्मिणी शिवलिंग कुंभार (वय ४० रा.बलसुर ता. उमरगा) या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना बुधवारी सकाळी मयत झाल्या. त्या सोमवारी दुपारी टमटम मधून उमरगा येथे निघाल्या होत्या . त्यावेळी पाठीमागून पिकअप धडकल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उमरगा येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते .