》पूर्व विभागासाठी आ. कल्याणशेट्टी जवळपास निश्चित; पश्चिम भागासाठी अनेकांची नावे चर्चेत
सोलापूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. BJP’s new strategy: Solapur district will get two district presidents, state president Chandrashekhar Bawankule त्यानुसार आता प्रत्येक लोकसभेसाठी एक जिल्हाध्यक्ष भाजपकडून नियुक्त करण्यात येत आहे, असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापुरात दिले. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याला सोलापूर लोकसभा (पूर्व: विभाग) आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी ( पश्चिम विभाग) एक असे प्रत्येकी दोन जिल्हाध्यक्ष मिळणार आहेत शहर आणि जिल्हाध्यक्ष या दोन्ही पदाच्या निवडी 15 मे ते 25 मे दरम्यान होतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
सलग तिसऱ्यांदा लोकसभा बहुमताने जिंकण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली आहे. महाराष्ट्रातील सर्व 48 च्या जागा जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याशिवाय त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही सेनेबरोबर युती करून 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या भाजपचा प्रयत्न असणार आहे, त्या दृष्टीने चंद्रशेखर बावनकुळे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
लोकसभा जिंकण्यासाठी आता भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघ संघासाठी एक जिल्हाध्यक्ष नेमण्याचे नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार करता सध्या सचिन कल्याणशेट्टी हे एकमेव जिल्हाध्यक्ष आहेत. आता माढा लोकसभा मतदारसंघासाठी ही एका जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करण्यात येणार आहे. महिलेच्या प्रकरणात अडकल्यामुळे श्रीकांत देशमुख यांना जिल्हाध्यक्ष पदावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून आ. सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती पक्षाने केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या वर्षाच्या कालावधीत सचिन कल्याणशेट्टी यांनी चांगले काम केले आहे. अक्कलकोट तालुक्यातील दोन्ही बाजार समितीवर त्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर लोकसभेसाठी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड निश्चित मानली जात आहे. सोलापूर पूर्व विभागांमध्ये शहर उत्तर शहर दक्षिण शहर मध्य अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा असे संघ येणार आहेत.
दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघासाठी अनेक दावेदार पुढे येण्याची शक्यता आहे. पश्चिम विभागांमध्ये करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला ग्रामीण या तालुक्याचा समावेश होणार आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी साधारणता 25 मे दरम्यान करण्यात येतील असे बावनकुळे यांनी सांगितले.
● प्रत्येक मतदारसंघासाठी असणार निवडणूक प्रमुख
आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून भाजपने आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक निवडणूक प्रमुख नेमण्याचे नियोजन केले आहे. सध्या जे भाजपचे आमदार आहेत तेच त्या मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख असणार आहेत. ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार नाही तेथे एका चांगल्या निवडणूक प्रमुखाचा शोध घेतला जाईल, असे संकेत बावनकुळे यांनी सांगितले आहे. जो निवडणूक प्रमुख असेल तोच त्या मतदारसंघाचा पुढील उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रमुख नेमण्यासाठी बावनकुळे संपूर्ण 288 मतदारसंघाचा दौरा लवकरच सुरू करणार आहेत.
● २८८ विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार : बावनकुळे
भाजपाने लोकसभेच्या सर्व ४८ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे दोन विभाग नेमून त्याला दोन स्वतंत्र्य जिल्हाध्यक्ष नेमावे, अशी अनेकांची मागणी होती, त्याला प्रदेशने मान्यता दिली आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख नेमला जाणार आहे; त्यासाठी आपण लवकरच संपूर्ण २८८ विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहोत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.