Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फायनान्समध्ये काम करणाऱ्या तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

फायनान्समध्ये काम करणाऱ्या तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2023/05/14 at 7:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
》 कार रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षामधील तिघेजण जखमीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 अल्पवयीन मुलीचा विनयभंग व अपहरण, एकावर पोक्साेअन्वये गुन्हा

सोलापूर : एका खासगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या विवाहीत तरुणाने रेल्वे खाली झोकुन देऊन आत्महत्या केली. ही घटना छत्रपती संभाजी तलाव परिसरातील रेल्वे पुलाखाली शनिवारी (ता. 13) दुपारी उघडकीस आली .

 

विरेश श्रीपाद जीर (वय २८ रा.न्यू सुनील नगर, एमआयडीसी, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. दुपारी त्याने तलावाजवळील एका झाडाखाली आपली दुचाकी उभी केली. त्यानंतर त्याने पुलाखाली रेल्वे खाली आत्महत्या केली. याची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी रेल्वे अंगावरून गेल्याने त्याच्या शरीराचे दोन भाग झाल्याचे आढळून आले. त्याच्या खिशात मिळालेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली.

 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. मयत विरेश जीर हा विवाहीत असून तो एका खाजगी फायनान्स कंपनी कामाला होता . या घटनेची नोंद लोहमार्ग पोलिसात झाली असून या मागचे कारण अद्याप समजले नाही .

 

》 कार रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षामधील तिघेजण जखमी

 

सोलापूर : अक्कलकोट येथील महालक्ष्मी मंदिराच्या समोर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. कार चालकाने भरधाव वेगाने पाठीमागून येऊन रिक्षाला धडक दिली.

यात रिक्षामधील तिघेजण जखमी झाले आहेत. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वसंत बिराजदार (वय-३७,रा.किसन नगर,अक्कलकोट रोड) हे रिक्षा घेऊन जात होते. तेव्हा रिक्षामध्ये तीन ते चार प्रवासी होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारने रिक्षाला जोरदार धडक दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

या अपघातात वसंत हे गंभीर जखमी झाले. शिवाय रिक्षामधील धनराज धनशेट्टी (वय-१५,रा.दत्त नगर) या मुलालाही डोक्याला जखम झाली आहे. अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

 

हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षा पलटी झाली. अपघातानंतर कार चालक पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद सिविल पोलीस चौकी झाली आहे.

 

》 अल्पवयीन मुलीचा विनयभंग व अपहरण, एकावर पोक्साेअन्वये गुन्हा

 बार्शी  : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळवून नेल्याप्रकरणी एकावर विनयभंग, अपहरण व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत तुळशीराम भोसले (वय २० रा. नागोबाचीवाडी ता. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नांव आहे. पीडीतेच्या आईने फिर्याद दिली आहे.
दि. ७ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पीडीत मुलगी शाळेत जात असताना प्रशांतने तिचा पाठलाग करून तिला त्रास दिला होता. त्यावेळी त्याने पीडीतेच्या भावालाही मारहाण केली होती तसेच पीडीतेच्या कुटूंबियांना धमकी दिली होती. त्यानंतर दि. १३ मे २०२३ रेाजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रशांत पीडीतेस तिच्या कुटूंबियाच्या संमतीविना मोटारसायकलवरून पळवून घेवून गेला. पळवून घेवून जात असताना राळेरास येथे वैराग पोलीसांनी पकडले. त्यांनी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे त्या दोघांना आणले. त्यानंतर तिच्या कुटूंबियांनी याबाबत फिर्याद दिली. दरम्यान, पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #youngman #working #finance #committed #suicide #train #Solapur #Barshi #abducted #molested, #फायनान्स #काम #तरुण #रेल्वेखाली #आत्महत्या #बार्शी #सोलापूर #अपहरण #विनयभंग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दक्षिण भारतीय राज्यातून भाजप बाहेर; 36 वर्षांनंतर काँग्रेसला मिळाल्या 136 जागा
Next Article कर्नाटक मुख्यमंत्री निवड समितीत सोलापूरचे सुशीलकुमार शिंदेंचे नाव

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?