Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सहकार शिरोमणीच्या सभासदांसमोर सक्षम पर्याय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

सहकार शिरोमणीच्या सभासदांसमोर सक्षम पर्याय

Surajya Digital
Last updated: 2023/05/15 at 1:32 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ शरद पवार यांच्यासमोर झालेली चर्चा फिस्कटली

□ पहिल्यांदाच निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता

पंढरपूर : सुरज सरवदे

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून गेल्या 20- 22 वर्षापासून कारखान्याची धुरा चेअरमन कल्याणराव काळे हे सांभाळत आहेत.  Competent option before the members of Sahakar Shiromani Kalyanrao Kale Pandharpur Abhijit Patil Election Rangatdar त्यांनी कारखान्याचे विस्तारीकरण केला आहे. उपपदार्थ प्रकल्प कार्यन्वित केले आहेत. मात्र, त्यांना कारखाना पूर्ण क्षमतेने चालवता आला नाही. कारखान्यामध्ये कल्याणराव काळे यांची मजबूत पकड आहे. नातेसंबंधात सर्व सभासद वर्ग जोडला गेला आहे. त्यामुळे कल्याणराव काळेंच्या साम्राज्याला आजपर्यंत कोणी छेद दिला नाही. कल्याणराव काळे यांची पकड असल्यामुळे कारखान्यात सत्तांतर झाले नाही.

 

मात्र गेल्या काही वर्षापासून कारखान्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. कारखान्याला पतपुरवठा करण्यासाठी बँका तयार नाहीत. मागील गळीत हंगामात बँकांनी कारखान्याचा कर्ज दिली नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन कारखाना सुरू केला होता.

 

कारखान्याच्या दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कारखाना कधीच वेळेवर शेतकऱ्याची देणे देत नाही. असाच त्यांचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यात झाला आहे. यावर्षीचे ऊस बिल पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी चेअरमन कल्याणराव काळे आणि त्यांच्या संचालक मंडळावर आहे. सभासदांच्या नाराजीचा फटका यंदा कल्याणराव काळे यांना बसण्याची शक्यता आहे.

 

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी संचालक दीपक पवार आणि डॉ बी पी रोंगे यांनी स्वतंत्र पॅनल उभा करून कल्याणराव काळे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. मात्र दोन पॅनल झाल्यामुळे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या विजय झाला होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

गेल्या दहा वर्षापासून दीपक पवार यांनी कल्याणराव काळे यांच्या विरोधात रान उठवले आहे. शेतकऱ्यांना एफ आर पी मिळवून देणे, सिताराम साखर कारखान्याच्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी दीपक पवार यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये त्यांना चांगले यश सुद्धा मिळाला आहे.

 

शेतकऱ्याचे बिल वेळेवर न दिल्यामुळे कारखान्याची भिस्त ज्या नातेवाईकांवर होती ते नातेवाईक आज कल्याणराव काळे यांच्यापासून दुरावले आहेत. नंदकुमार बागल, धनंजय काळे यांच्यासारखे जवळचे नातेवाईक दुरावल्याचा मोठा फटका कल्याणराव काळे यांना होऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदाच या कारखान्याच्या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याचा असंतोष कधी नव्हे तो बाहेर पडत आहे. त्यामुळे परिवर्तनाची चाहूल सरकार शिरोमणीच्या निवडणुकीत सभासदांना दिसत आहे.

 

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजीत पाटील यांनी सत्ता प्रस्थापित केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास अभिजीत पाटील यांनी संपादन केला आहे. ऊसाला एफ आर पी पेक्षा जास्त दर दिला आहे. शेतकऱ्यांचे ऊस बिल वेळेवर दिले आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी आहे. अभिजीत पाटील यांच्याकडे सत्ता आल्यामुळे उसाला चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्याला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना पहिल्यांदाच सक्षम पर्याय अभिजीत पाटील यांच्या रूपात दिसत आहे.

 

सध्या परिस्थितीमध्ये कारखान्याची आर्थिक परिस्थिती ही बिघडलेली आहे. शेतकऱ्यांना ऊसाला चांगला भाव मिळत नाही. वेळेवर उसाचे बिल मिळत नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हे पिसलेले आणि दबलेले आहेत. अभिजीत पाटील यांच्या रूपाने त्यांना सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.

 

□ शरद पवार यांच्यासमोर झालेली चर्चा फिस्कटली

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांच्या समोर अभिजित पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, गणेश पाटील यांच्यात मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीसाठी दिपक पवार यांनी बोलवले नसल्यामुळे निवडणुकीचा तोडगा निघू शकत नाही असे अभिजित पाटील यांनी पवारांना सांगितले. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर पुन्हा शरद पवार यांच्या समोर बैठक घेतली जाईल असे सांगितले आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Competent #option #before #members #Sahakar #Shiromani #KalyanraoKale #Pandharpur #AbhijitPatil #Election #Rangatdar, #सहकार #शिरोमणी #सभासद #सक्षम #पर्याय #पंढरपूर #निवडणूक #रंगतदार #अभिजीतपाटील #कल्याणरावकाळे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवीन वाळू धोरण । महसूल विभागाचा झाला निर्णय, मात्र अंमलबजावणीचे घोडे अडल
Next Article लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार; महाविकास आघाडीतील नेते ठाम

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?