○ पश्चिम विभागासाठी अनेकजण चर्चेत: धैर्यशील यांचे पारडे जड
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने जोरदार रणनीती सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपसाठी प्रत्येक लोकसभा महत्त्वाची आहे. Lok Sabha election. Sachin Kalyanshetty is preferred for the post of Solapur East Division District President.
यासाठी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या दोन लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने आता दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याचे ठरवले आहे. सोलापूरचे पूर्व विभाग आणि पश्चिम विभाग असे दोन विभाग पाडण्यात आले असून या दोन्हीमध्ये जिल्हाध्यक्ष कोण असावा याचा आढावा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी नुकताच घेतला आहे.
नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापुरात आले होते, त्यावेळी त्यांनी महाबैठक घेऊन सोलापूर मध्ये दोन जिल्हाध्यक्ष होणार असल्याचे सांगितले होते. या दौऱ्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष विक्रम पावसकर हेही उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान पावसकर यांनी संपूर्ण जिल्ह्यातील अकरा तालुक्यामधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि दोन्ही भागात जिल्हाध्यक्ष कोण असावा याबाबत माहिती घेतली आहे.
सोलापूर पूर्व मधून बहुतांश जणांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनाच पुन्हा अध्यक्षपदी नेमावे असे पावसकर यांना सांगितले तर काहीजणांनी शशिकांत चव्हाण यांना संधी द्यावी अशी मागणी केली. सोलापूरच्या पूर्व विभागात अक्कलकोट, शहर उत्तर, दक्षिण आणि मध्य, मोहोळ, पंढरपूर- मंगळवेढा, या मतदारसंघाचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दुसरीकडे पश्चिम भागामध्ये धैर्यशील मोहिते पाटील, गणेश चिवटे, राजकुमार पाटील, आमदार राजेंद्र राऊत यांची नावे सुचवण्यात आली आहेत. पाटील स्वतः जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नाहीत मात्र पक्षाने जबाबदारी दिली तर ते स्वीकारण्यास तयार असल्याचे समजते. दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी गणेश चिवटे यांच्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पश्चिम भागात येणाऱ्या जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक जणांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव सुचवल्याची माहिती आहे.
पश्चिम भागात माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा, बार्शी या मतदारसंघाचा समावेश आहे. प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर ही माहिती वरिष्ठ पातळीवर कळवणार आहेत. साधारण २० ते २५ मे दरम्यान जिल्हाध्यक्ष निवडी होणार आहेत.
● मोदी @९ जनसंपर्क अभियान समिती
विशेष जनसंपर्क अभियानासाठी मोदी @९ जनसंपर्क अभियान समिती बनवण्यात आली आहे. यामध्ये आ. प्रवीण दरेकर संयोजक असून, आ. संजय कुटे, आ. श्रीकांत भारतीय सहसंयोजक आहेत. याशिवाय खा. डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे विदर्भ, आ. जयकुमार रावल यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, खा. धनंजय महाडिक यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र, आ. निरंजन डावखरे यांच्याकडे कोकण आणि ठाणे तर आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी दिली आहे. चित्रा वाघ यांच्याकडे प्रदेश महिला, राहुल लोणीकर यांच्याकडे युवा भाजप तर श्वेता शालिनी यांच्याकडे सोशल मिडीयाची जबाबदारी दिली आहे.
● ३० मे ‘पासून विशेष जनसंपर्क अभियान
भाजपतर्फे ३० मे ते ३० जून दरम्यान महासंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ९ वर्षातील कामगिरी, त्यांनी राबवलेल्या कल्याणाकारी योजनांची माहिती घराघरात पोहचवणे, बुथ प्रमुखांशी संवाद साधणे, प्रत्येक मतदारसंघातून रॅली काढले, मंत्र्यांच्या सभा घेणे, सोशल मिडीयावर सर्व योजनांची माहिती प्रसिद्ध करणे आदी प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबाबत १६ आणि १७ रोजी होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.