Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुशीलकुमार शिंदेंचा वारंवार अपमान होऊ देणार नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

सुशीलकुमार शिंदेंचा वारंवार अपमान होऊ देणार नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Surajya Digital
Last updated: 2023/05/21 at 6:41 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

● भाजपच्या माजी शहराध्यक्षांचे काँग्रेसमध्ये प्रवेश, प्रमोद महाजनांपासून होते कार्यरत

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)नाना पटोले यांच्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे हे खासदार असले पाहिजेत, असं तुम्ही म्हणतात. पण, ते निवडणूक लढायला तयार नाहीत, असं मला त्यांनी कानात सांगितले. तुमची इच्छा असेल तर ते निवडणुकीला उभे राहतीलही.  Sushilkumar Shinde will not be insulted again and again: Congress state president Nana Patole Congress meeting Solapur Ashok Nimbargi BJP target पण या निवडणुकीत ते बहुमताने निवडून आले पाहिजेत, ही जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला जबाबदारीच घ्यायची नसेल तर वारंवार सुशीलकुमार शिंदे या चांगल्या माणसाचा मी अपमान होऊ देणार नाही.

 

 

सोलापूरसह माढा लोकसभेवर नाना पटोले यांचा दावा केला आहे. मला सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणायचे आहेत, असे ठणकावून सांगितले. सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेस समितीच्या वतीने आज रविवारी सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा झाला. काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते.

 

सोलापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केलाय. अशोक निंबर्गी हे प्रमोद महाजन यांच्यापासून भाजपत कार्यरत होते. मात्र आज त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचं नाना पटोले यांनी स्वागत केले.

 

प्रा. निंबर्गी हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते मानले जात होते. जनसंघाच्या काळापासून ते कार्यरत आहेत. प्रा. निंबर्गी यांच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्याने पक्ष सोडणे हा भाजपला धक्का मानला जात आहे. प्रा. निंबर्गी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला पण त्यांना अपयश आले.

 

सुशीलकुमार शिंदेंना निवडून आणायची तुम्ही जबाबदारी घेणार का, असा सवाल नाना पटोले यांनी करताच उपस्थितींमधून जबाबदारी घेणार असा प्रतिसाद मिळाला. मला सोलापूर लोकसभेची जागा, तर जिंकायचीच आहे. पण त्याबरोबरच माढ्याची जागाही जिंकायची आहे. कारण, मला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे मला तुमची हमी हवी असल्याचे नाना पटोले म्हणाले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले साहेब यांचे सोलापूर विमानतळासमोर भव्य स्वागत माजी सभापती तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केले #INCMaharashtra #INCIndia #RahulGandhi #kharge #kcvenugopalmp #HKPatilINC #NANA_PATOLE pic.twitter.com/YZBU8nNadF

— Vijaykumar Hatture 🇮🇳 (@vijayhatture) May 21, 2023

 

 

नाना पटोले यांच्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

 

सध्याचं केंद्रातलं सरकार हे घोषणाबाज सरकार आहे.सामान्य लोकांच्या खिशातले पैसे काढायचे, हे मोदी सरकारने ठरवलंच आहे. सध्याच्या सरकारची कृती ही महागाईची आहे. केंद्र सरकार देश विकून खात आहे. ज्याप्रमाणे इंग्रजांना हाकलले त्याप्रमाणेच भाजपलाही हाकलायची वेळ आली आहे’, अशा शब्दांत केंद्र सरकारच्या दोन हजारांच्या नोटबंदीच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. खोटारडी व्यवस्था, लोकशाही मान्य नसलेला आणि लोकांना गरीब ठेवणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. मी मोदीसारखा खोटारडा माणूस नाही. मोदींनी सांगितले होते की, सैनिकांचे ड्रेस सोलापुरात शिवतो. मात्र आता सरकारने सैनिकच ठेवले नाहीत त्यांचे खासगीकरण केलं. सोलापुरात हुतात्मे, महात्मे आणि क्रांतिवीर आहेत. सोलापूरचे पूर्वीचे खासदार हे मोठ्या अंगठ्या घालून यायचे आणि लोकसभेत झोपत होते, असं म्हणत पटोले यांनी भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे यांच्यावर टीका केली.

सोलापूरकर हे मागील दहा वर्षात ते पन्नास वर्ष मागे गेले आहेत. भाजपच्या विचारला माफ करण्याची ही वेळ नाही. नाहीतर तुम्ही संपाल. महाराष्ट्रात मागील काही दिवसात 9 धार्मिक दंगली झाल्या. अकोल्यात 2 हजार पोलिस आहेत मात्र दंगल सुरु झाल्यावर तिथले पोलीस गायब होते. दोन तास तिथे पोलीस नव्हते. म्हणून मी पोलीस महासंचालकांना विचारलं की पोलिसांवर कोणाचा दबाव असल्याचे म्हटल्याचे पटोले म्हणाले.

 

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

TAGGED: #SushilkumarShinde #insulted #againandagain #Congress #statepresident #NanaPatole #Congress #meeting #Solapur #AshokNimbargi #BJP #target, #सुशीलकुमारशिंदे #वारंवार #अपमान #काँग्रेस #प्रदेशाध्यक्ष #नानापटोले #सोलापूर #काँग्रेस #मेळावा #भाजप #निशाणा #अशोकनिंबर्गी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Next Article रस्त्यात एसटी बसचे स्टिअरिंग झाले लॉक; लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या कारला नेले फरफटत

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?