Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाच्या महामारीतही आयपीएलचा फिव्हरचा जोर; धोनी विरुद्ध शर्मा वाद रंगला, सेहवागने फटकारले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीखेळ

कोरोनाच्या महामारीतही आयपीएलचा फिव्हरचा जोर; धोनी विरुद्ध शर्मा वाद रंगला, सेहवागने फटकारले

Surajya Digital
Last updated: 2020/08/23 at 5:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीतही आयपीएलचा फिव्हर जोर धरू लागल्याचा दाखला कोल्हापुरात घडलेल्या घटनेमुळे मिळाला. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आता भारतातील क्रिकेट फिव्हर चांगलाच वाढताना दिसत आहे. एरवी आयपीएल स्पर्धेच्या काळात आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या संघांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळते. मात्र, कोल्हापुरात हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या महेंद्रसिंह धोनी विरुद्ध रोहित शर्मा असा वाद रंगला आहे. याच वादातून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे धोनीच्या एका चाहत्याला शेतात नेऊन बडवल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी या घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी याने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर धोनीच्या काही चाहत्यांनी डिजिटल फलक लावून त्याचे आभार मानले होते.
यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्याच्या चाहत्यांनीही कुरुंदवाडीमध्ये डिजिटल फलक लावले.

त्यामुळे कुरुंदवाडीत एमएस धोनी विरुद्ध रोहित शर्मा असे कोल्ड वॉर सुरु झाले होते. अशातच एका चाहत्याने विरोधी गटाच्या डिजिटल फलकावर ब्लेड मारला. यानंतर शाब्दिक बाचाबाची होऊन हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. तुर्तास हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले नसले तरी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

 

* विरेंद्र सेहवागने फटकारले

दोन दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या दोघांचे समर्थक कोल्हापूर येथील कुरुंदवाडमध्ये एकमेकांना भिडल्याचा दावा करण्यात आला होता. या वृत्ताची खुद्द भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने दखल घेतली आहे. त्याने ट्विट करुन या चाहत्यांना फटकारले आहे. वेड्यांनो काय करत आहात. एकतर खेळाडू एकमेकांबद्दल प्रेमभावना ठेवतात किंवा जास्त बोलत नाहीत आपल्या कामाशी मतलब ठेवतात. पण, काही फॅन्स वेडे असतात. मारामारी करु नका. भारताच्या संघाला एकच आहे, असे माना.’ असे कॅप्शन दिले.

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #आयपीएल #फिव्हर #रोहितशर्मा #धोनी #वाद #सेहवाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाविकास आघाडीतील नेते शेतीप्रश्नावर आमने-सामने; कृषी खातं झोपलं आहे की काय ? संतप्त सवाल
Next Article जागतिक वडापाव दिन कधी सुरु झाला? कोणत्या राजकीय पक्षाने ब्रॅण्डींग केले, वाचा सविस्तर

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?