सोलापूर – बारावी इयत्तेत शिकणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खेड (ता.उत्तर सोलापूर ) येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. A 12th standard student committed suicide by hanging himself in a field in Solapur village bale khed
राहुल संजय क्षीरसागर (वय १८ रा. खडकगल्ली,बाळे) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज गुरूवारी (ता. २५) दुपारी १ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह शेतातील पत्राशेड मधे छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत राहुल हा एकुलता असून त्याच्या पश्चात आई असा परिवार आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार महिंद्रकर पुढील तपास करीत आहेत .
》 नांदणी चेकपोस्ट येथे ट्रकच्या धडकेने दुचाकी वरील तरुण ठार; एक जखमी
सोलापूर – विजयपूर महामार्गावरील नांदणी चेक पोस्टजवळ ट्रकच्या धडकेने दुचाकी वरील तरुण ठार तर दुसरा जखमी झाला . हा अपघात बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
हावरूसिद्ध गंगण्णा वड्यार (वय २४ रा.सातलगाव ता. इंडी जि.विजापूर) असे मयत झालेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. तो काल रात्री आपल्या दुचाकीवर गुरु मल्लय्या गुंजेटी (वय २६) याच्यासोबत अकलूज येथे निघाला होता.नांदणी चेक पोस्ट मधून बाहेर येणारा एनएल०१-केजी ५४१३ या हा ट्रक धडकल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला. गुरु गुंजेटी हा गंभीर जखमी झाला. जखमीला सोलापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
》 पंढरपूर तालुका परिसरात विष प्राशन; दोघे रुग्णालयात
सोलापूर – पंढरपूर तालुका परिसरातील सुस्ते आणि भोसे येथे राहणाऱ्या दोघांनी विविध कारणावरून विष प्राशन केले. त्यांना पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . अण्णा नामदेव गायकवाड (वय ४० रा. सुस्ते ता.पंढरपूर ) याने बुधवारी रात्री पत्नीबरोबर भांडण झाल्याने रागाच्या भरात विष प्राशन केले होते.
तर कृष्णात विष्णू बोंगे (वय३६ रा . भोसे ता .पंढरपूर) याने बुधवारी रात्री भोसे पाटी जवळ पैशाच्या व्यवहारातून विष प्राशन केले होते . अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.