सोलापूर : दक्षिण सोलापूरच्या लवंगी येथील घरी यात्रेसाठी येऊन माघारी बंगळुरूला निघालेल्या कांबळे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. 6 killed in fatal accident in Solapur Hospet Lavangi Karnataka Kamble Kamble कर्नाटकातील होस्पेटच्या दोट्टीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कांबळे हे बंगळुरूला कामाला आहेत. ते 15 दिवसांपूर्वी यात्रेसाठी गावी आले होते. परत कुटुंबासोबत बंगळुरूला जात असताना वाटेत नंद्राळ इंडी येथील बहिणीच्या नातेवाईकांनाही त्यांनी सोबत घेतले होते.
कर्नाटकातील हॉस्पेटजवळील दोट्टीहाळ गावाजवळ रविवारी सायंकाळी ट्रक कारच्या भीषण – धडकेत लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील चौघांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. लवंगी येथील हे दांपत्य आपल्या दोन मुलांसह कारमधून बंगळुरूला निघाले होते. इंडी तालुक्यातील नंद्राळ येथील त्यांच्या दोन नातेवाइकांचाही अपघातात मृत्यू झाला.
राघवेंद्र सुभाष कांबळे (वय 24 ) जानू राघवेंद्र कांबळे (वय २३). राकेश राघवेंद्र कांबळे (वय ५) व रश्मिका राघवेंद्र कांबळे (वय २, सर्व रा. लवंगी) अशी मृतांची नावे आहेत. राघवेंद्र यांची बहीण कोमल यांच्या इंडी तालुक्यातील नंद्राळ गावच्या दोघा नातेवाइकांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. संतोष व खाजू अशी त्यांची नावे असल्याचे समजले. दोघांची पूर्ण नावे समजू शकली नाहीत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राघवेंद्र कांबळे हे १५ दिवसांपूर्वी लवंगी या आपल्या गावी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते. ते बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत काम करायचे. रविवारी ते पत्नी, दोन मुलांसह कारमधून बंगळुरूला निघाले होते. वाटेत नंद्राळ येथील बहिणीच्या नातेवाइकांना घेऊन ते पुढे निघाले.
हॉस्पेटच्या पुढे गेल्यानंतर भरधाव ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. कार ट्रकच्या खाली अडकली. अपघात इतका भीषण होता की कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. राघवेंद्र कांबळे हे वडील सुभाष व आई इंदुमती यांचे एकुलते पुत्र होते. त्यांना तीन विवाहित बहिणी आहेत.
राघवेंद्र कांबळे हा वडील सुभाष व आई इंदुमती यांचा एकुलता एक मुलगा होता. तर त्यास तीन विवाहित बहिणी आहेत. राघवेंद्रसह त्याची पत्नी व दोन चिमुकल्या मुलांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने लवंगी गावावर शोककळा पसरली आहे.