○ चार दिवसापूर्वीच वडीलांचे निधन
चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीच्या मेंदाता रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. Sad! Chandrapur MP Balu Dhanorkar passed away Nagpur Congress four days father passed away
आज मंगळवारी पहाटेच त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. 3 दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तर बाळू धानोरकर यांना नागपूरच्या रुग्णालयात 26 मे रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीला हलवण्यात आले. धानोरकर काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार होते.
धानोरकर यांना किडनीसंबंधीच्या आजारावर उपचारासाठी आधी नागपूर येथील खासगी उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वीच एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली येथे नेण्यात आले होते. तेथे मेदांत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मागील दोन दिवसांपासून बाळू धानोरकर व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे कुटुंबिय देखील दिल्लीत दाखल झाले होते. त्यांच्य प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती काल मिळत होती. मात्र आज रात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती समोर आली. बाळू धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे.
Sad to learn that our @INCIndia parliamentary colleague, Suresh Narayan Dhanorkar (MP from Chandrapur constituency in Maharashtra) passed away overnight, the second demise of a Congress MP during the 17th Lok Sabha. He was only 47. My condolences to his loved ones. Om Shanti. pic.twitter.com/qwCQ8XamEc
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 30, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Saddened to learn about the untimely passing away of Shri Suresh Narayan Dhanorkar, Congress MP (Lok Sabha) from Chandrapur Maharashtra. He was a grassroots leader.
Our deepest condolences to his family, friends and followers.
May they get the strength to overcome this loss. pic.twitter.com/gRO1ABPD4T
— Mallikarjun Kharge (@kharge) May 30, 2023
धानोरकर यांचे पार्थिव नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येईल. दुपारी 2 ते बुधवारी (३१ मे) सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे भद्रावती येथे झालेल्या वडिलांच्या अंतिम संस्काराला बाळू धानोरकर हे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे बाळू धानोरकर यांचे भाऊ अनिल यांनी अंतिमविधी केले.
● धानोरकर यांचे निधन… राजकीय प्रवास
बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करणारे धानोरकर 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत गेले. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकले. राज्यात काँग्रेसचे ते एकमेव खासदार होते. लोकसभेत विविध विषयांवरील चर्चेत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करतानाच, आपल्या मतदारसंघाचे तसेच, विदर्भाचे प्रश्न त्यांनी लावून धरले.
– बाळू धानोरकर यांचे आज दिल्लीत निधन झाले.
– 2019 मध्ये चंद्रपुरातून जिंकत राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले
– शिवसैनिक म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात
– शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली
– चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव होते.
– शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकी जिंकली होती.
– 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.