» कामगारांसाठी लढा चालूच ठेवण्याचा मानस
» ‘संघर्षाची मशाल हाती’चे थाटात प्रकाशन
» मान्यवरांकडून आडम यांच्या संघर्षमय जीवनाचे कौतुक
सोलापूर : मृत्युशय्येवर असताना आईने विडी कामगारांना घर मिळवून देण्याचे वचन घेतले होते. त्या वचनाची पूर्तता केली हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. Fulfillment of mother’s promise from the cradle of a weedy worker: Narsayya Adam Master Thatat Prakashan Solapur यापुढेही कामगारांसाठी आयुष्यभर लढा देईन असे प्रतिपादन माजी आ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले. आज पंतप्रधान मोदींकडून बाबासाहेबांची घटना बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हीच घटना आता त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असे आडम मास्तर म्हणाले.
माजी आ. नरसय्या आडम यांच्या जीवनावर लिहिण्यात आलेल्या ‘संघर्षाची मशाल हाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा थाटात पार पडला, त्यावेळी आडम सत्काराला उत्तर देताना बोलत होते. सुरूवाती पुस्तकाचे प्रकाशन माकपचे ज्येष्ठ नेते, माजी खा. सीताराम येचुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माकपचे पॉलिट बिरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. उदय नारकर, ॲड. एम. एच. शेख, कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, सुहास कुलकर्णी, युसुफ मेजर, सनी शेट्टी, ॲड. अनिल वासम, आदी व्यासपिठापर उपस्थित होते.
मास्तर पुढे म्हणाले, लहानपणी गरीब परिस्थिती होती. एका महत्वाच्या कामासाठी गावाला एसटीने जाता आले नाही तेव्हा मी ठरवले होते की एसटीच काय एक दिवस मी विमानात बसेन. मी १९७८ साली प्रथम आमदार झालो. मुंबईवरून नागपूरला विमानाने गेलो आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी असंघटित कामगारांसाठी काम करत आहे. आज ४१ हजार ६०० लोकांना आपण घर मिळवून दिली. यात आनंद यासाठी स्वपक्षीयांसह विरोधी पक्षातील लोकांचेही सहकार्य मिळाले. त्यावरून कळाले की आहे.
कामगारांसाठी जो झटतो, त्याला कोणत्याही अडचणी येत नाहीत, सर्वजण त्याला मदत करता. त्यामुळे आगामी काळातही आपण कामगारांसाठी कायम झटत राहणार.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● मास्तरांची आत्मकथा प्रेरणा देणारी : येचुरी
आडम मास्तर यांचे जीवन संघर्षमय राहिले आहे. त्यांनी आपल्या जीवनात पाहिलेले चढ-उतार आत्मकथेत उतरवले आहेत. त्यांची आत्मकथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे. याशिवाय नवीन पिढीलाही या आत्मकथेतून संघर्ष कसा करायचा हे शिकण्यासाठी मिळणार आह. आडम मास्तर यांच्यापुढे आणखीन लढाया आहेत ते यापुढेही निश्चित न झुकता त्या लढाया लढतील आणि निश्चित जिंकतील, असा विश्वास माजी खासदार सिताराम ये चोरी यांनी व्यक्त करत आराम मास्तर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
● २५ लाखही घेतले नाही आणि मंत्रिपदही नाही
वसंतदादा पाटील यांच्या सरकारविरोधात बंडखोरी करून ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतदादांनी नागपूर अधिवेशनावेळी दिग्गज नेत्यांसोबत माजी आमदार निवासात भेट घेतली आणि पवार यांच्याविरोधात भूमिका घेण्यासाठी मला आग्रह केला. रोख २५ लाख रुपये आणि विधान परिषदेचे सदस्यत्व देण्याचे आमिषही दाखविले. वसंतदादांचा तो प्रस्ताव मी धुडकावला. ही माहिती मिळताच पवार यांनी मला मंत्रिपदाची ऑफर दिली होती.
मात्र, ती ऑफर मी नम्रमपणे नाकारली, असे आडम यांनी भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक एम. एच. शेख यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले. यावेळी डॉ. ढवळे, डॉ. नारकर यांनीही आडम यांच्या संघर्षयम जिवनाचे कौतूक केले.
● कार्यकर्त्यांनी घातले मास्तरांचे मुखवटे
कॉ. मुरलीधर सुचू यांच्या नेतृत्वाखाली खाली काढण्यात आलेल्या स्वागत रॅलीत कार्यकर्त्यांनी मास्तरांचा मुखवटा धारण करून त्यांच्या प्रति प्रेम व्यक्त करत अनोख्य शुभेच्छा दिल्या. हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. याची सर्वत्र चर्चा होत होती.