मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. Chief Minister took note of Sharad Pawar’s threat; Increase in security outside Pawar’s house Devendra Fadnavis Eknath Shinde शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी आली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकी दिलेल्या ट्वीटमध्ये ‘तुमचा दाभोळकर होणार,’ असे लिहिलेले आहे. धमकी देणाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी नेत्यांनी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शरद पवार यांना ट्वीटरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या मुंबई पोलिस आयुक्तालयात दाखल झाल्या आहेत. दोन ट्वीटर अकांऊट वरुन त्यांना ही धमकी मिळाली आहे. ‘भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल’ असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटर अकाऊंटवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आयुक्तालयात दाखल झाले आहे.
धमकीची मला चिंता नाही, धमक्या देऊन कुणी आवाज बंद करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी आज दिली आहे. तसेच कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान पवार यांना आज ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर सरकारनेही सतर्क होत त्यांच्या घरासमोर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनाही फोनवरून शिवीगाळ करत धमकी देण्यात आली आहे.
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गृहमंत्रालयाने या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच महाराष्ट्रात सध्या द्वेषाचे राजकारण सुरु आहे. काही झाले तर याला गृह खाते जबाबदार असेल, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजकीय पातळीवर मतभेद असतील पण मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी येणं खपवून घेणार नाही. कायद्याप्रमाणे पोलिस कारवाई करतील. सभ्येतेच्या मर्यादा ओलांडणे खपवून घेणार नाही,” असे फडणवीस म्हणाले आहेत.