Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शी नगरपालिकेची गाडी आली, थांबली आणि गेली; पर्युषण पर्वातही मत्स्यविक्री चालूच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

बार्शी नगरपालिकेची गाडी आली, थांबली आणि गेली; पर्युषण पर्वातही मत्स्यविक्री चालूच

Surajya Digital
Last updated: 2020/08/23 at 11:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी :  नगरपालिकेच्या मत्स्यविक्री केंद्राजवळ दुपारी कर्मचार्‍यांनी भरलेली गाडी आली, काही काळ थांबली आणि गेली. गाडी येण्यापूर्वी मत्स्यविक्री चालूच होती, गाडी आल्यानंतर विक्रेत्यांची थोडी पळापळ झाली, परंतू काही मिनिटात गाडी गेली की पुन्हा मत्स्यविक्री सुरुच राहिली. पर्यूषण पर्वानिमित्त मांस विक्री बंद ठेवण्याच्या सूचना असतानाही मांस विक्री चालू असल्याचे पाहवयास मिळाले.

शहरातील तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीसमोर असलेल्या मच्छी मार्केट समोर हा प्रकार घडला. पर्यूषण पर्वानिमित्त मांस विक्री बंद ठेवण्याच्या सूचना असल्यामुळे हे केंद्र बंद आहे की नाही, पहाण्यासाठी हे कर्मचारी आले होते, मात्र या केंद्रातील म्होरक्याला बाजूला घेवून थोडी चर्चा झाल्यानंतर कर्मचारी आनंदाने दुसर्‍या ठिकाणी पहाणीसाठी निघून गेल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शहरात सध्या कोरोना निमित्ताने नगरपालिकेने अनेक सर्वेक्षण पथके तयार केली आहेत. त्यांच्या दिमतीला पोलिस आणि गाडीही दिली आहे. याच पथकाकडे आज रविवारी मांस विक्री आस्थापना बंद आहेत कि नाहीत, हे पहाण्याची जबाबदारी होती. एमएच 13 पी 0411 क्रमाकांच्या नगरपालिकेच्या जीपमधून हे पथक आले होते. या पथकाची गाडी मच्छी मार्केट समोर उभी राहिली की विक्रेत्यांना या गाडीचे येण्याचे कारण लगेच उमगले.

त्यांनी लगेच बंद आहे, बंद आहे, असा गलका सुरु गेला. तरीदेखील काही कर्मचारी गाडीतून उतरून आत जावून पहाणी करुन आले तेंव्हा त्यांना मार्केट चालूच असल्याचे दिसले. मग त्यातील काही कर्मचार्‍यांनी तिथल्या महोरक्याला बाजूला या असे खुणावत थोडे पलीकडे नेले. अवघे काही सेकंदच त्यांच्यात चर्चा झाली आणि मार्केट बंद आहे, अशा अविभार्वात गाडी निघून गेली. विक्रेत्यांनी मात्र हे नेहमीचेच आहे, आम्हाला त्याची सवय आहे, असे सांगत आपल्या कामाला पुन्हा सुरुवात केली.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #पर्युषणकाळ #बार्शी #नगरपरिषद #मांसविक्री #मत्सविक्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चोरुन काढलेला अंघोळीचा व्हिडिओ दाखवून विवाहितेवर आठ महिने अत्याचार; अखेर धाडस करुन दिली फिर्याद
Next Article अनुकंपा तत्वावर वायरमन पदाच्या नोकरीसाठी ५६९ तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?