□ कारवाईची माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न, अधिकारी फोन उचलेनात
सोलापूर : महापालिका प्रशासनाने चिमणी पाडकामाला दिलेली मुदत रविवारी संपली असून सोमवारी महापालिका कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Siddheshwar Factory Chimney Demolition Expired; Now Solapur Focus on the Role of Municipal Corporation मात्र अद्याप रविवारी रात्री उशिरापर्यंत तरी महापालिका प्रशासनाची चिमणी पाडकामाची कोणतीही तयारी दिसत नाही तर पोलीस प्रशासनाने आम्ही सूचनेची वाट पाहत आहोत पोलीस बंदोबस्त लावण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
महापालिकेने चिमणी पाडकामासाठी दिलेली ४५ दिवसाची मुदत अकरा ११ जून रोजी संपली आहॆ. तत्पूर्वी चिमणी पाडकामाविरोधात सिध्देश्वर साखर कारखान्याने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली. पुढील सुनावणी २० जून रोजी ठेवली आहे. मात्र चिमणीच्या पाडकामाला स्टे दिला नाही. त्यामुळे चिमणी पाडण्याची महापालिकेच्या मुदतीबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यामुळे महापालिकेला मुदत संपल्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे, तो अधिकार तसाच राहिला आहे. आता महापालिका प्रशासन त्यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काल, रविवारी रात्री उशिरापर्यंत तरी महापालिकेकडून कोणतेही तयारी नसल्याचे दिसून आले. अनेक अधिकाऱ्यांचे फोन स्विच ऑफ होते तर आयुक्तांसह अनेकांनी फोन उचललेच नाहीत. त्यामुळे महापालिकेकडून कारवाई होईल का नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
चिमणी पाडकामासाठी दिलेले मुदत संपली आहे हा संवेदनशील विषय आहे आम्हाला अद्याप पर्यंत कोणत्याही सूचना आल्या नाहीत सूचना आल्या की आम्ही बंदोबस्त लावू कदाचित उद्या याबाबत महापालिकेसोबत बैठक होण्याची शक्यता आहे असे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी सांगितले.
सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पुन्हा गाजू लागली आहे. महापालिका आयुक्तांनी सुनावणी घेऊन ही चिमणी बेकायदेशीर असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे. 28 मे रोजी महापालिकेने कारखान्याला पत्र पाठवून 45 दिवसात ही चिमणी स्वतःहून पाडावी नाहीतर त्यानंतर महापालिका पाडेल असे पत्र दिले होते. 10 जून रोजी या पत्राचा कालावधी पूर्ण झाला आहे. शिवाय दहा दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या दौऱ्यात चिमणी पाडून विमानसेवा सुरू होईल असे संकेत दिले होते. महापालिका तसेच जिल्हा आणि पोलीस प्रशासन आणि देखील चिमणी पाडकामाची तयारी सुरू केली होती.
आता चिमणी पडणार का यावर पैसा लागल्या असताना कारखान्याने पुन्हा मुंबई हायकोर्टात चिमणी पाडकामा विरोधात धाव घेतली आहे. महापालिकेने हायकोर्टात देखील कॅव्हेट दाखल केली आहे. त्यामुळे वाट न पाहता महापालिकेने सुमोटो हजर राहून आपल्या कौन्सिल मार्फत म्हणणे सादर करावे आणि तातडीने चिमणी पाडकाम करावे, अशी मागणी संजय थोबडे यांनी केली आहे.