● रिकामे मटके फोडून व्यक्त केला रोष, अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर भेट देण्याचा इशारा
अक्कलकोट : अक्कलकोट शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी एकत्र येत आज वज्रमूठ आवळली. Akkalkot: Water supply every 10-12 days; Rosh Mahavikas Aghadi Siddharam Mhetre by breaking pots in front of Municipal Council for water आज सोमवारी धडक मोर्चा काढला. मोर्चातील महिलांनी नगर परिषदेसमोर रिकामे मटके फोडून आपला रोष व्यक्त केला.
नगरपरिषद प्रशासनाने आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर भेट देण्यात येईल, असा इशारा धडक मोर्चातील सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. अक्कलकोट शहराला सध्या दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाने धडक मोर्चा काढला. हा धडक मोर्चा एवन चौकातील काँग्रेस कार्यालयापासून सकाळी 11 वाजता काढण्यात आला. या मोर्चात राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा शितलताई म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप सिध्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख आनंद बुक्कानूरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रईस टिनवाला, माजी विरोधी पक्ष नेते अशपाक बळोर्गी, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, माजी नगरसेवक सलीम यळसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष राम जाधव, युवा नेते लाला राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मोर्चा काँग्रेस कार्यालयापासून ते बस स्थानक परिसर, विजय कामगार चौक, कारंजा चौक, मेन रोड, कापड बाजारपेठ, राजे फत्तेसिंह चौक, जुना तहसील कार्यालय, एवन चौक ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी नगरपरिषद प्रशासनाने गरिबांच्या जीवाशी खेळू नये. आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.
यावेळी अशपाक बळोरगी, दिलीप सिध्दे, आनंद बुक्कानूरे ,चंद्रशेखर मडीखांबे ,शितल म्हेत्रे ,प्रिया बसवंती, मल्लिकार्जुन पाटील सम्यक युवक अध्यक्ष रवी पोटे आदींनी नगरपरिषद प्रशासनाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा बांगड्यांचा आहेर भेट देण्याचा इशारा दिला.
या धडक मोर्चात माजी नगरसेवक मतीन पटेल, श्रीशैल अळोळी, काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मैनोद्दीन कोरबू, मुबारक कोरबू, चंदन आडवीतोटे ,रामचंद्र समाने, वंचित आघाडीचे भारत देडे, शिवसेना नेते सोपान निकते, सुनील खवळे अलीबाशा आत्तार, शिवू स्वामी, शिवसेना शहर प्रमुख मल्लिनाथ खुबा, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा माया जाधव आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना , वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते ,नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेते मंडळींच्या हस्ते नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सावित्रीमाई फुले संस्थेच्या सावित्रीमाईरत्न पुरस्काराचे बुधवारी वितरण
सोलापूर – येथील सावित्रीमाई शिक्षण व बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या यंदाच्या सावित्रीरत्न पुरस्कारासाठी
विविध क्षेत्रातील आठजणांची निवड करण्यात आल्याची घोषणा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव जंबगी यांनी केली.
यामध्ये अक्षरा व आरोग्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालिका सारिका सचिन नरोटे,
हत्तूर- चंद्रहाळच्या सरपंच ज्योती राजेंद्र कुलकर्णी, सोलापुरातील मातोश्री नर्सिंग होमच्या डॉ. योगिनी सचिन जाधव ,शंकरलिंग महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री मल्लिनाथ थळंगे,अभियंता महादेव ईरण्णा आकळवाडी, दैनिक संचारचे उपसंपादक नंदकुमार किसन येच्चे,साप्ताहिक शौर्यचे संपादक योगेश्वर विठ्ठलसा तुरेराव, पानमंगरुळचे ग्रामविकास अधिकारी शिवानंद भीमराया सोलापूरे या आठजणांची सावित्रीरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
येत्या बुधवारी, 14 जून रोजी सकाळी 11 वाजता रंगभवन येथील समाज कल्याण केंद्रात या पुरस्काराचे वितरण निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार
व जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी डॉ.अशोक हिप्परगी, एम.के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे, पानमंगरूळचे उपसरपंच मलिक मुजावर, नाना रणदिल, सुधीर जोशी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जंबगी, उपाध्यक्षा राजश्री तीर्थ व सचिवा सारिका पवार यांनी केले आहे.