संभाजीनगर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गट आणि भाजपावर जबरदस्त निशाणा साधला आहे. ’50 खोके घोषणा दिल्यावर शिंदेंच्या गटातील सगळ्यांना खूप राग यायचा. 50 boxes were endorsed by the BJP itself; Narendra in the country… Devendra in the state ‘Nanded Banner Baji अनेकांनी आम्हाला खासगीत बोलून दाखवले. आता काल नांदेडमध्ये भाजपचे एक पोस्टर होते, त्यात 50 खोके, 105 डोके असे पोस्टर लावले होते. आम्ही करत असलेल्या आरोपाला त्याने दुजोराच मिळाला,’ असे पवार म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांना राज्यापुरतं न थांबता देशापर्यंत पोहोचावं असं वाटत असल्याने त्यांनी हा जाहिरातबाजीचा प्रयत्न सुरू केल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. पण, या सगळ्या गोष्टी जनतेच्या हातात असतात आणि कुणाला देशात पाठवायचं किंवा कुणाला पाठवायचं नाही, हे जनता जनार्दन ठरवेल, असा टोलाही अजित पवार यांनी हाणला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातबाजीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, सगळ्या महाराष्ट्रात त्यांची जाहिरातबाजी सुरू झाली आहे. उद्या एखादवेळी तुम्हालाही पक्ष काढायचा असेल आणि जाहिरात करण्याइतपत पैसे असतील तर तुम्हीही करू शकता. ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना वाटतं की आपण आता राज्यापुरतं न थांबता देशापर्यंत पोहोचावं. म्हणून त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. अशा अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत प्रयत्न केले. काहीजणांना यश आलं काहींना अपयश आलं. या सगळ्या गोष्टी जनतेच्या हातात असतात. जनता जनार्दन ठरवेल कुणाला तिथे पाठवायचं आणि कुणाला तिथे पाठवायचं नाही ते, असा टोलाही पवार यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : www.surajyadigital.com
बॅनरची चर्चा देशात नरेंद्र राज्यात एकनाथ शिंदे अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आता बॅनरवॉर सुरू झाल्याचे दिसत आहे. नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचणारे बॅनर अज्ञातांनी लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशात नरेंद्र, तर राज्यात देवेंद्रच असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. तसेच पन्नास खोके आणि 105 डोके असा उल्लेख करत आर्य चाणक्याचा फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे.
दरम्यान, या बॅनरवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांचं आतमध्ये खूप काही चाललं आहे, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. हे सरकार लवकरच पडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे ते पाहावे. महायुतीत सर्व काही आलबेल नाहीये, असं नाना पटोले म्हणाले.
नांदेडच्या मध्यवर्ती भागातच चौकात हे बॅनर्स लागले होते. या भल्या मोठ्या बॅनर्सवरील मजकूर शिंदे गटाला डिवचणारा होता. त्यातून भाजपलाही चिमटे काढण्यात आले होते. 50 खोके, 105 डोके… देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच… माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस समर्थक, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं. या बॅनरवर चाणक्याचा फोटो होता. तसेच असंख्य खोक्यांचाही फोटो होता. त्यामुळे या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली होती. हे बॅनर कुणी लावले अशी चर्चा होती.
भाजपने जर बॅनर लावले असतील तर ते त्यावर खोक्यांचा फोटो का छापतील? 50 खोके, 105 डोके… असं म्हणून विरोधकांच्या आरोपांना बळ का देतील? असा सवालही या निमित्ताने केला जात होतो. कुणी तरी अज्ञात व्यकीने किंवा विरोधकांकडून कुणी तरी हे बॅनर लावल्याची चर्चा होती. दरम्यान, हे बॅनर लागल्यानंतर पोलिसांनी आणि पालिकेने त्याची गंभीर दखल घेतली. हे बॅनर लागलीच हटवण्यात आलं आहे.