सोलापूर : रागाने पाहिल्याच्या कारणावरून मारहाण करत तरुणावर ब्लेडने गळ्यावर वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. The young man was stabbed in the neck with a blade; Crime against seven people Solapur Joshi Galli Rickshaw
ही घटना १८ जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अंबिकानगर एम.एस.ई.बी ऑफिस समोर घडली. याप्रकरणी विकास उर्फ (पप्पू) सुरेश दोरकर (वय-२८,रा. गणेश नगर, बाळे) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून समाधान सरवदे, किरण सरवदे, बापू सरवदे,सुनील भोसले,बाबा भोसले,मोहन शिंदे,व्यंकटेश हुल्लुर (सर्व. रा. जोशी गल्ली बाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी विकास यांच्या चुलत मावशीचे मुलं समाधान आणि किरण यांनी तू आमच्याकडे रागाने का पाहिले असे म्हणून दोघांनी रिक्षामधील लाकडाने फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली. बापू सरवदे याने तेथे पडलेला दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर सुनील भोसले,बाबा भोसले,मोहन शिंदे यांनी रिक्षा मधून खाली उतरून फिर्यादीला छातीस व पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली.
दरम्यान व्यंकटेश याने त्याच्याकडील असलेले ब्लेडने विकासाच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई भोईटे हे करीत आहेत.
● घर बांधण्यासाठी विवाहितेकडे तीन लाखाची मागणी; पतीसह चौघांवर गुन्हा
सोलापूर : मला घर बांधायचे आहे तू तुझ्या आई-वडिलांकडून तीन लाख रुपये घेऊन ये नाहीतर इथे राहू नको मी बाहेर बाई ठेवलेली आहे. तुला काय येत नाही तुझ्याशी कोण लग्न केलं असतं असे म्हणत विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली.
ही घटना जानेवारी २०२० ते ६ जूलै २०२० दरम्यान मु.पो.हैदा येथे घडली.याप्रकरणी ऐश्वर्या रमेश शिंदे (रा.रेल्वे कॉलनी,गणेश हॉल) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती रमेश शिंदे,नागप्पा शिंदे,नणंद प्रियंका शिंदे,चुलत काका बुधप्पा कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तसेच सासरे नागप्पा शिंदे, प्रियंका शिंदे व बुध्दप्पा कांबळे यांनी रमेश शिंदे यांना समजावून न सांगता वाईट शिकवूण तू रमेश ला सोडून दे असे म्हणून शिवीगाळ करत असत. ६ जुलै २०२० रमेश शिंदे याने पुन्हा घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये आण नाहीतर तुला मी नांदावणार नाही असे म्हणून मारहाण केली. त्यावर फिर्यादीच्या वडिलांनी फोन केला. त्यांनाही तीन लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्या मुलीला घेऊन जा असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नदाफ हे करीत आहेत.
● चोरट्याने घरात प्रवेश करून मोबाईल, रक्कमसह सोन्याची अंगठी पळवली
सोलापूर : अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील मोबाईल, रोख रक्कम व सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना दि.१९ जून रोजी रात्री बारा ते पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान सुरज निवास न्यू रंगराज नगर माया अपार्टमेंट समोर घडली.
याप्रकरणी संतोष श्रीमंत वाघमारे (वय-३५,रा. सुरज निवास, न्यू रंगराज नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी त्यांच्या घरी झोपेत असताना, अज्ञात चोरट्याने घराच्या कंपाउंड वरून प्रवेश करत गॅलरीतील दरवाजा अर्धवट उघडा असल्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील असलेला मोबाईल,रोख रक्कम व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उबाळे हे करीत आहेत.