Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘चिमणी’ चे शुक्लकाष्ट संपले ! विमानसेवा सुरु होणार, प्रतिसादही मिळणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

‘चिमणी’ चे शुक्लकाष्ट संपले ! विमानसेवा सुरु होणार, प्रतिसादही मिळणार

Surajya Digital
Last updated: 2023/06/21 at 9:12 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》संकेत जेसुदास म्हणतात…● ‘चिमणी’ राजकारणाचा केंद्रबिंदू

→ शहराच्या उद्योगवाढीसाठी उपयुक्त

सोलापूर : विमानसेवेला अडथळा ठरणारी साखर कारखान्याच्या ‘चिमणी’ चे शुक्लकाष्ठ संपल्याने होटगी रोड विमानतळावरून येत्या तीन-चार महिन्यात विमानसेवा सुरु होण्याचे संकेत आहेत. एअर इंडिया अॅथॉरिटीच्या निकषाप्रमाणे सोलापूरच विमानतळ सर्व सोयीचे सुसज्ज आहे. The auspicious season of ‘Chimani’ is over! Air service will start, response will also be received from Solapur Kingfisher Airlines Jesudas

या विमानसेवेला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद तर मिळेलच शिवाय उद्योगवाढीच्या दृष्टीने सोलापूरला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याला सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी तसेच किंगफिशर एअरलाईन्सचे माजी व्यवस्थापक व मूळचे सोलापूरचे संकेत जेसुदास यांनी दुजोरा आहे.

सोलापूरच्या विमानतळाची निर्मिती १९६७-८७ साली झाली. या विमानतळाची २००९ ला चाचणी झाली. २०१० ला किंगफिशरने प्रवासी विमानसेवा सुरू केली. पण ती काही कारणांमुळे बंद पडली. त्यानंतर विमानतळावरील धावपट्टीची रनवे, सुरक्षा भिंग आणि इतर समस्या निर्माण झाल्याने कुठल्या विमान कंपन्या येथे विमानसेवा देण्यास तयार होत नव्हत्या. त्यातच २०१४ श्री सिध्देश्वर साखर कारखान्याने को- जनरेशनसाठी ९२ मीटर उंचीची अनधिकृत चिमणी उभी केली. आणि हीच ‘चिमणी’ पुढे विमानसेवा कायमची बंद होण्यास मोठा अडथळा ठरली. नंतर अलीकडे सोलापूर विकास मंच विमानसेवेसाठी आग्रही झाली. आणि कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी आंदोलनाचे हत्यार घेऊन पुढे आले.

दरम्यान याप्रकरणी न्यायालयीन लढेही झाली. महापालिकेने पाडकाम मोहीम हाती घेताच राजकीय हस्तक्षेप होत गेला आणि वेळोवेळी चिमणीला जीवदान मिळाले. अखेर महापालिकेने आक्रमक होऊन १५ जून रोजी ही अडथळ्याची आणि वादग्रस्त ‘चिमणी’ जमीनदोस्त करून विमानसेवेचा मार्ग मोकळा करून दिला. यामुळे सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास कुठलीही अडचण नाही.

सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑझ सिव्हिल एव्हीशन (डीजीसीए) आणि ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हीशन सिक्युरिटी या दोन संस्थांच्या परवानग्या आवश्यक असून यासाठी सोलापूर विमानतळाचे व्यवस्थापक बानोत चॅम्पला हे प्रयत्नशील आहेत. या परवानग्या हाती पडताच सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्यास कुठलीच बाधा येणार नाही.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》संकेत जेसुदास म्हणतात…

 

किंगफिशर एअरलाईन्सचे सोलापूरचे माजी व्यवस्थापक व मूळचे सोलापूरचे संकेत येसुदास यांच्याशी सोलापूर होटगी रोड विमानतळ आणि विमानसेवेबाबत प्रश्न विचारुन बातचित साधली. त्याचा हा सारांश.

● आता सोलापूरला विमानसेवा चालू होईल का ?

हो नक्कीच, विमानसेवेसाठी कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे विमानसवा सर्व परवाने मिळविल्यानंतर येत्या पाच महिन्यात सुरु होण्यास काहीच अडचण नाही.

● होटगी रोड विमानतळ सुसज्ज आहे म्हणजे काय ?

 

२०१२ साली सुशीलकुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर सोलापूरचे विमानतळ एअर इंडिया अॅथॉरिटीने युद्धपातळीवर दुरुस्त केले. या अॅथॉरिटीचे संचालकच सोलापूर होते. त्यामुळे त्यांनी पुणे-मुंबईच्या धर्तीवर सोलापूरच्या विमानतळाचा रनवे, संरक्षक भिंत, इतर बाबी पूर्ण केल्या. आता सध्या सोलापूरचे विमानतळ सर्व सुविधांनी सुसज्ज असून संपूर्ण वातानुकूलित आहे.

● विमानेसवा सुरु झाल्यास त्याला प्रतिसाद मिळेल काय ?

केंद्राच्या उडाण योजनेत सोलापूर विमानसेवेचा समावेश असल्याने विमान कंपन्यांना टेक-ऑफ, लॅण्डिंग आणि पार्किंग या सुविधा मोफत मिळणार आहे. तसेच प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू होण्यास काहीच अडचण नाही. सोलापूर हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे बाहेरून येणारे आणि येथून जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ वाढेल.

● विमानसेवा सुरु झाल्यानंतर नोकरी, उद्योगवाढीच्या संधी काय ?

सोलापूर हे चादर, टॉवेल, रेडिमेड कपड्यांचे माहेरघर आहे. विमानसेवेमुळे आयात-निर्यात जलदगतीने होईल. तरुणांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. मुंबई-पुणे अलीकडील दाटीवाटीने वाढले आहे. याचा परिणाम तेथील नवउद्योजक साहजिकच सोलापूरला येतील.

● विमानसेवा सुरु होती ती का बंद पडली ?

सोलापूरचे विमानतळ १९८६-८७ साली कार्यान्वित झाले. २००९ साली चाचणी झाली. त्यानंतर २०१० साली किंगफिशरची प्रवासी विमानसेवा सुरू झाली. पण पुढे काही कारणामुळे ही विमानसेवा कंपनीने ३१ ऑक्टोबर २०१२ ला बंद केली. त्यानंतर दुसरी कंपनी आली असती पण रनवे आणि इतर कारणामुळे या कंपन्या आल्या नाहीत. रनवे खराब झाल्याने त्यावरील खडी विमानच्या पात्याने लागत असल्याने तो एक धोका निर्माण झाला. शिवाय इतर सुविधांचाही अभाव होता. यामुळे विमानसेवा बंद पडली.

 

 

● ‘चिमणी’ राजकारणाचा केंद्रबिंदू

 

विमानसवा आणि राजकारण खरंतर दोन वेगळे विषय आहेत. पण ‘चिमणी’ पाडल्यानंतर राजकारणात वणवा पेटला. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांची सहानुभूती मिळविण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक स्थानिक नेते त्यांना जाऊन मिळाले. चिमणी पाडल्यानंतर जणू काही या सर्वानी ‘सुतक’ पाळले की काय, असेच चित्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

या सर्वांनी एकच टारगेट ठेवले ते भाजपा. आगामी निवडणुकीत भाजपाचा वचपा काढू, अशी गर्जना सर्वच विरोधी पक्षांनी केली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ‘चिमणी’ हा विरोधकांचा प्रचाराचा आणि कळीचा मुद्दा ठरणार असला तरी विमानेसवा सुरु झाल्यानंतर सोलापूरला होणार फायदा पाहून सोलापूरकर काय निर्णय घेणार?, हे येणारा काळच ठरविणार आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #auspicious #season #Chimani #over #Airservice #start #response #received #Solapur #Kingfisher #Airlines #Jesudas, #चिमणी #शुक्लकाष्ट #सोलापूर #विमानसेवा #प्रतिसाद #उद्योगवाढी #उपयुक्त #जेसुदास #किंगफिशर #एअरलाईन्स
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 73 कोटींच्या पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्यास मान्यता, शासन निर्णय जारी
Next Article प्रति पंढरपूर उभारणे, काळाची गरज – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?