अक्कलकोट : अक्कलकोटजवळ भीषण रस्ते अपघातात दोन वाहनांची धडक बसून सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. देवदर्शन करून कर्नाटकात गावी परत जाताना भाविकांवर काळाने घाला घातला. Fatal accident in Solapur: 6 people died in an accident while returning from Devdarshan, Akkalkot Shirwal
सोलापुरात एक भीषण अपघात झाला आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये टँकर आणि जीपचा भयंकर अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीजवळ हा अपघात झाला आहे. ते सर्व देवदर्शनावरुन परत येत होते. यात 6 ते 7 जखमी झाले आहेत. तसेच, समृद्धीवर कोपरगावजवळ भीषण अपघात झाला आहे. यात 18 महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे..
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ भाविकांच्या क्रुझरला भीषण अपघात झाला आहे. टँकर आणि क्रूझरमध्ये समोरासमोर झालेल्या या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अक्कलकोट-कलबुर्गी रस्त्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिरवळवाडी (ता. अक्कलकोट) येथे सिमेंटवाहू बल्कर गाडीला पाठीमागून क्रूझर गाडीची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. एकमेकांचे निकटचे नातेवाईक असलेले मृत भाविक आळंद ( जि. कलबुर्गी) येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण क्रूझर गाडीमध्ये (केए ३५ ए ७४९५) बसून देवदर्शनासाठी महाराष्ट्रात आले होते.
आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इतर सहा ते सात जखमींना उपचाराकरिता अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवले आहे. यात पाच महिला एका मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रुझर गाडी वागदरीकडे जात होती आणि टँकर हा गुलबर्गाहून सोलापूरकडे येत होता. गाडी कर्नाटक पासिंग असल्याची माहिती मिळत आहे. देवदर्शन करुन गावाकडे जात असताना हा अपघात झाला.
शिरवळवाडी शिवारात सिमेंट वाहतुकीच्या बल्करला (एमएच १२ यूएम ७१८६) क्रूझरची पाठीमागून जोराची धडक बसली. मृत आणि जखमींची नावे लगेचच समजू शकली नाहीत. अपघात घडताच शिरवळवाडी परिसरातील तरुणांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलीस अधिकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघाताचे निरीक्षण करीत तपास सुरू केला आहे.
या भीषण अपघातामध्ये कर्नाटकातील अणूर (ता. आळंद) गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती परिसरातील गावांमध्ये समजतात मदत कार्य वेगाने सुरू झाले. जखमींना रुग्णालयाकडे आणले जात आहे. या घटनेची माहिती समजताच रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे वागदरी ग्रामपंचायतीचे उमेश पोमाजी हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून या घटनेचा तपास करत आहेत.