सोलापूर – तुम्ही आम्हाला २५ लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला २ हजार रुपयाच्या सव्वा कोटीच्या नोटा देतो. अशी थाप मारून पुण्यातील तिघा भामट्यानी भांबुर्डी येथील इसमास पंचवीस लाख रुपयास गंडविले. 25 lakhs was stolen for giving Rs 2,500 crore notes, incident in Malshiras taluka
ही घटना भांबुर्डी (ता. माळशिरस) येथे शनिवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास घडली. यासंदर्भात नामदेव जयराम वळकुंद्रे (वय २९ रा.मेडद ता.माळशिरस) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे माळशिरसच्या पोलिसांनी नवनाथ उर्फ नाथा (रा वाघोली जि .पुणे) आणि त्याच्या दोघा साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नामदेव वलकुंद्रे (रा.मेडद) यांचा माळशिरस परिसरात गॅरेजच्या व्यवसाय आहे. त्यांचे मामा सोमनाथ वाघमोडे हे भांबुर्डी येथे राहतात. पुण्यातील त्यांच्या परिचयात असलेल्या नवनाथ उर्फ नाथा याने वाघमोडे यांना आमच्याकडे दोन हजार रुपये किमतीच्या भरपूर नोटा आहेत. तुम्ही आम्हाला शंभर आणि पाचशे रुपयाच्या नोटा दिल्यास आम्ही तुम्हाला पाचपट दोन हजार रुपयाच्या नोटा देतो असे सांगितले होते.
त्याप्रमाणे सोमनाथ वाघमोडे यांनी शनिवारी दुपारी नवनाथ उर्फ नाथा याला २५ लाख रुपये दिले. त्यानंतर तिघांनी पैसे घेऊन पोबारा केला . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माळशिरस पोलिसात फिर्याद दाखल केली. पुढील तपास फौजदार पुजारी करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ जोडभावी पेठ पोलिसांनी चोराला अटक करून तीन दुचाकी जप्त केले
सोलापूर – जोडभावी पेठ पोलिसातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने नागेश भीमाशंकर पाटील (वय २८ रा. घोंगडेवस्ती ) या चोराला अटक करून चोरीस गेलेल्या तीन मोटरसायकली जप्त केले.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भवानी पेठ येथील प्रभाकर सिंगरल यांच्या घरासमोरुन दुचाकी चोरीस गेली होती. त्याप्रमाणे त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. चोरीस गेलेली दुचाकी नागेश पाटील याने पळविली असून तो दहिटणे येथे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला शनिवारी दहिटणे येथे दुचाकीसह अटक केली. त्यावेळी त्याने आणखीन दोन दुचाकी चोरल्याचे कबुली दिली. पोलिसांनी तिन्ही दुचाकी जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पवार, हवालदार आरेनवरू,श्रीकांत पवार, शिवशरण, सरवदे आणि कसगावडे यांनी केली.
○ मजूर पुरवतो म्हणून करंजे येथील शेतकऱ्यास ५ लाखात गंडविले
सोलापूर – चालू गळीत हंगामासाठी ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून करंजे (ता. करमाळा) येथील शेतकऱ्यास ४ लाख ८० हजार रुपयास गंडविण्यात आले.
या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी बाबूलाल दगडू पावरा (रा.बीडगाव ता.चोपडा जि.जळगाव) याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोपट धोंडीबा सरडे (रा.करंजे) यांनी पोलिसात नुकतीच फिर्याद दाखल केली. त्यांनी चालू गळीत हंगामासाठी बाबूलाल पावरा याच्यासोबत पांडे येथील विठ्ठल शुगरच्या कार्यालयात करार केला होता. त्यानुसार त्याच्या खात्यावर ४ लाख ८० हजार रुपये २५ जून २०२२ रोजी पाठविले होते. त्यानंतर पावरा याने एकही ऊसतोड मजूर पुरवला नाही.
कांही दिवसापूर्वी पावरा हा सरडे यांना करमाळा येथील बसस्टॅड येथे भेटला होता. त्यांनी करारासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी त्याने पैसे आणि मजूर पुरवणार नाही. असे म्हणून धमकी दिली होती, अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार रणदिवे पुढील तपास करीत आहेत .