सोलापूर : ना हरकतीचा ठराव घेण्यासाठी १० हजाराची लाच घेताना उत्तर तालुक्यातील अकोलेकाटीचे ग्रामसेविका कीर्ती अर्जुनराव वांगीकर यांना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. There is no problem in the ACB’s net when taking a bribe of 10,000
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे हॉटेल व लॉजिंगसाठी आवश्यक असलेला ग्रामपंचायतचा ठराव ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लोकसेवक श्रीमती किर्ती अर्जुनराव वांगीकर (वय 43, ग्रामसेविका, ग्रामपंचायत अकोलेकाटी ता. उत्तर सोलापूर) यांनी १०,००० रुपये लाचेची मागणी करून पंचायत समिती उत्तर सोलापूर या कार्यालयात ठरलेली रक्कम स्वतः घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर सदर बझार पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
ही कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर. पोलीस अंमलदार सपोफी, मल्लीनाथ चडचणकर, पोह शिरीषकुमार सोनवणे, पोह रशीद बाणेवाले, पोना श्रीराम घुगे, पोकों राजु पवार चालक राहुल गायकवाड यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● लांबोटी येथे एसटीच्या धडकेने दुचाकीवरील चौघे जखमी
सोलापूर – दुचाकी वरून वडवळ येथे देवदर्शनासाठी जात असताना पाठीमागून एसटी धडकल्याने सोलापुरातील चौघेजण जखमी झाले . हा अपघात पुणे महामार्गावरील लांबोटी जवळ आज सोमवारी (ता.17 ) सकाळच्या सुमारास घडला.
श्रीराज श्रीनिवास रापेल्ली (वय १९), शंकर अवधूत (वय ३८), शैलेश कनकी (वय २३ ) आणि प्रवीण वल्लाळ (वय ३२ सर्व रा. घोंगडेवस्ती,भवानी पेठ) अशी जखमीची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सर्व दोन दुचाकीवरून आज सकाळी वडवळ येथे निघाले होते. साडेसात वाजेच्या सुमारास लांबोटी जवळ पाठीमागून एमएच१४-बीटी – ३६६५ या क्रमांकाचे एसटी बस धडकल्याने सगळेजण जखमी झाले, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ शेतात विष प्राशन केलेल्या मजुराचा मृत्यू
माढा येथील शेतात काम करताना विष प्राशन केलेला तुकाराम लक्ष्मण बाजगीरे (वय ३४ रा.मुखेड जि.नांदेड) हा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना रविवारी रात्री मयत झाला.
त्याने १४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास माढा येथील मारकड यांच्या शेतात वीष प्राशन केले होते. त्याला सिद्धेश्वर दगडू मारकड (मालक) यांनी माढा येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल केले होते. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .