Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलीस दलात खळबळ; पत्नी अन् पुतण्याची हत्या करुन पोलिसाची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

पोलीस दलात खळबळ; पत्नी अन् पुतण्याची हत्या करुन पोलिसाची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2023/07/24 at 5:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पुणे : पोलिसाने आज पहाटे केलेल्या गोळीबाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. भरत गायकवाड यांनी पत्नी मोनी व पुतण्या दीपक यांची गोळ्या घालून हत्या केली. नंतर त्यांनी स्वतःलाही संपवले. Excitement in the police force; Policeman commits suicide by killing his wife and nephew Pune Amravati suicide note भरत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त होते. ते पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन परिसरात राहत होते. सुट्टीवर ते पुण्यात आले होते. कोणत्या कारणाने ही घटना घडली, याची माहिती समोर आली नाही. सुसाइड नोटही सापडली नाही.

 

पुणे शहरात आज सोमवारी पहाटे दुर्देवी घटना घडली. बड्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत:चा शेवट केला. एका सुखी कुटुंबाचा काही क्षणात शेवट झाला. या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना चौकशीनंतर मिळणार आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली.

 

पोलीस दलातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस दलात असणारा तणतणाव की कौटुंबिक कलह? असे कोणते कारण या घटनेमागे आहे, याचा शोध पोलिस शोध घेत आहेत. भरत शेखा गायकवाड (वय 57) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर पत्नी मोनि गायकवाड (४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (३५) यांची हत्या झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब पुणे शहरात वास्तव्यास आहे. सोमावारी पहाटे चार वाजता त्यांनी पत्नीचा खून केला. त्यानंतर पुतण्यावर गोळी झाडली. या दोघांच्या खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मोनी गायकवाड (वय 44) ही भरत गायकवाड यांची पत्नी आहे तर दीपक गायकवाड (वय 35) हा त्यांचा पुतण्या आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की, आज पहाटे 3.30 च्या सुमारास एसीपीने प्रथम पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर गोळीचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि पुतण्या धावत आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. त्यांनी दरवाजा उघडताच एसीपीने त्यांच्या भाच्यावर गोळीबार केला, त्याच्या छातीत गोळी लागली. त्यानंतर गायकवाड यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली.

यादरम्यान तिघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून आणि त्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Excitement #policeforce #Policeman #commits #suicide #killing #wife #nephew #Pune #Amravati #suicidenote, #पोलीस #दल #खळबळ #एसीपी #पत्नी #पुतण्या #हत्या #आत्महत्या #अमरावती #सुसाइडनोट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन
Next Article लघुशंकेसाठी थांबलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची पैश्याने भरलेली पिशवी भरदिवसा पळवली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?