Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लघुशंकेसाठी थांबलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची पैश्याने भरलेली पिशवी भरदिवसा पळवली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

लघुशंकेसाठी थांबलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची पैश्याने भरलेली पिशवी भरदिवसा पळवली

Surajya Digital
Last updated: 2023/07/24 at 10:25 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मोहोळ : लघुशंकेसाठी थांबलेल्या सेवानिवृत्त सैनिकाच्या मोटारसायकलची तीन लाख रु रक्कम असलेली पैशाची पिशवी घेऊन मोटरसायकलवरील दोन चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना मोहोळ शहरापासून काही अंतरावर घडली. A retired soldier, who stopped for a small check, ran away with a bag full of money in broad daylight

 

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाफळे गावातील गोपीनाथ भानुदास दाडे हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथील कुरुल रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या खात्यातून घर बांधण्याच्या कामासाठी पैसे काढण्यासाठी त्यांच्या एम एच १३ ए वाय ६६९७ या क्रमांकाच्या मोटरसायकल वरून वाफळे येथून मोहोळ येथे आले होते.

स्टेट बँकेच्या खात्यातून पैसे काढून ते आपल्या वाफळे गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. बँकेतून काढलेली तीन लाख रुपयाची रक्कम त्यांनी आपल्या पिशवीमध्ये ठेवून पिशवी मोटरसायकलच्या हँडलला अडकवली होती. दुपारी ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले असताना सोलापूर पुणे रोडवर भारत पेट्रोल पंपावर त्यांनी दीड वाजणे दरम्यान पेट्रोल भरले व पंपाच्या पुढे बाहेर जाऊन लघवी करण्याकरिता मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवली.

 

गाडीवरून उतरताच तेवढ्यात अचानक पाठीमागून मोटरसायकल वरून दोन अनोळखी इसम त्यांच्या मोटरसायकल जवळ येवून थांबले पाठीमागे बसलेल्या हिरव्या रंगाचा चौकडा शर्ट घातलेला व्यक्ती त्यांच्या मोटरसायकल जवळ गेला व अडकवलेली पैशाची पिशवी काढून घेऊन मोटरसायकल वरून नरखेड रोडच्या दिशेने निघून गेला. याबाबत गोपीनाथ दाडे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. यावरून त्या अनोळखी दोन चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 तरुणीवर दुष्कर्म; एकावर गुन्हा दाखल

सोलापूर : दवाखान्यात गेलेल्या महिलेला घरी सोडतो असे सांगून रिक्षातून हॉटेलमध्ये नेऊन दुष्कर्म केल्याबद्दल एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत 24 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मन्यम व्यंकटय्या रामगल (वय 52, रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचे कर्नाटक येथील एक कुटुंबीय मड्डी वस्ती भागात राहण्यास आहे. पीडित महिलेची बहीण देखील त्याच परिसरात राहते. तिच्या शेजारी त्यांचा लांबचा नातेवाईक मन्यम हाही राहतो. पीडित तरुणी आपल्या वहिनी सोबत हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यावेळी त्यांना मन्यम याने पाहिले होते. दवाखान्यात तो पीडितेजवळ गेला व तिला तू येथे कशाला आली आहेस, चल मी तुला घरी सोडतो, असे सांगून त्याने तिला रिक्षामध्ये बसवून एका मित्राकडे नेले.

 

तेथून त्याने तिला एका लक्ष्मी मंदिरात नेऊन तिच्या गळ्यात एक पिवळा दोरा बांधला. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिला कोणत्याही नातेवाईकांना फोन लावू दिला नाही. त्याने पुन्हा त्या महिलेला कोर्टाजवळील एका ऑफिसमध्ये नेऊन तिचा फोटो लावलेल्या एका कागदावर धमकावून सह्या करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने आता आपण दोघे पती-पत्नी झालो आहे, असे सांगून तिच्यावर हॉटेलमध्ये दुष्कर्म केले तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, पीडित महिलेच्या भावाने पोलिसात पीडिता हरवल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलीस तिचा शोध घेत त्या हॉटेलवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मन्यम याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.

 

○ चोराने स्वागत नगरातून दुचाकीची पळवली

सोलापूर  : स्वागत नगर येथील कटिंग सलून दुकानाजवळ लावलेली दुचाकी (एमएच १३, बीएफ २७२९) चोरट्याने चोरून नेली आहे. या प्रकरणी लक्ष्मण खंडू कोरे (रा. मल्लिकार्जुन नगर) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. ३१ मे रोजी रात्री साडेआठ ते अकराच्या सुमारास चोरट्याने दुचाकी चोरल्याचे कोरे यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस हवालदार उबाळे तपास करीत आहेत.

 

 

 

 

You Might Also Like

सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी

पंढरपूरात चंद्रभागेची पातळी इशारा सीमेला; सर्व घाट बंद, आठ बंधारे पाण्याखाली

सोलापूर जिल्ह्यात 1688 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार

सोलापुरातील 96 बेकायदा बांधकामांची यादी महापालिकेकडून जाहीर, नामवंत बिल्डर आणि नागरिकांचा समावेश

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन होणार – उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

TAGGED: #retiredsoldier #stopped #solapur #small #check #ranaway #bag #fullofmoney #broad #daylight, #लघुशंका #थांबा #सेवानिवृत्त #सैनिक #पैश्याने #पिशवी #भरदिवसा #पळवली #दुष्कर्म #तरुण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलीस दलात खळबळ; पत्नी अन् पुतण्याची हत्या करुन पोलिसाची आत्महत्या
Next Article तक्रार नोंदवण्यावरून पोलिसाला छातीत मारला ठोसा; हवेत सत्तूर फिरवून धमकावले

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?