मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. BJP leader Kirit Somayya’s ‘that’ controversial video is not morphed but real, but who made the viral inquiry order तपास पथकाने या व्हिडीओचे विश्लेषण केले आणि तो मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचे आढळले. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांच्या आक्षपार्ह ‘व्हिडिओ’मुळे अडचणीत सापडले आहे. यानंतर मोठ्या आवेशाने या ‘व्हिडिओ’ची सखोल चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असता पहिल्याच टप्प्यात हा ‘व्हिडिओ’ खरा असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे सोमय्यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
व्हिडिओ’वरून विधिमंडळातही मोठा गदारोळ झाला होता. विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते आंबादास दानवे यांनी आपल्याकडे ‘पेन ड्राईव्ह’ असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोपही केलेले आहेत. सोमय्यांनीही व्हायरल झालेल्या त्यांच्या ‘व्हिडिओ’ची सखोल चौकशीची मागणी केली होती.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.. यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले#पुणे @Dev_Fadnavis @KiritSomaiya @INCIndia @INCMaharashtra pic.twitter.com/jjjH6ACxbn
— Bhagyashree jadhav (@BhagyashreeMJ) July 26, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एका मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी रात्री यासंदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी एक पेन ड्राईव्ह देखील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिला होता. या संपुर्ण प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.
आता याची चौकशी पूर्ण झाली आहे. आता हा ‘व्हिडिओ’ खरा असून यात कुठल्याही प्रकारचे ‘मोर्फिंग’ झाले नसल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्यापह कुठल्याही प्रकारची जाहीर घोषणा करण्यात आलेली नाही. हा ‘व्हिडिओ’ खरा असल्याची स्पष्ट झाले तर सोमय्यांच्या राजकीय अडचणी वाढणार आहेत.
या आदेशानंतर सोमय्यांच्या आक्षेपार्ह ‘व्हिडिओ’ची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १० चे पथक चौकशी करणार होते. त्यांना गुन्हे शाखेचे अधिकारी तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर पथकातील अधिकाऱ्यांचीही मदत होणार होती. आता सखोल चौकशी केली असता तो किरीट सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. आता हा ‘व्हिडिओ’ कुणी ‘व्हायरल’ केला याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.