● अमरावतीत पुस्तकाचा हवाला देऊन भिडेंची बाष्कळ बडबड
मुंबई : भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्या वडिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणांवरून मोठा विरोध करण्यात येत आहे. Case registered against Sambhaji Bhide Guruji; Protests in Yavatmal insult Mahatma Gandhi राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल भिडेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. शेवटी अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
संभाजी भिडे यांच्या विरोधात कलम 153, 505(2) त्यासोबतच आयोजक यांच्यावर सुद्धा 34 (अ) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. यासंबंधी अधिकृत माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे. महात्मा गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य संभाजी भिडे यांना भोवले आहे. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांविरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात अत्यंत अवमानकारक वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले होते. दरम्यान, भिडे यांच्या या वक्तव्याचे विधानसभेतही पडसाद उमटले असून विरोधकांनी भिडे यांना अटक करण्याची मागणी जोर लावून धरली.
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्याकडे विधानसभेचे लक्ष केंद्रित केले. यावेळी मनोहर भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. चव्हाण म्हणाले, काल अमरावतीत संभाजी भिडे नावाच्या एका गृहस्थाने राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत निंदापूर्वक, नालस्तीपूर्वक विधान केले आहे.
आपण त्याची माहिती घेतली असेल. अशा प्रकारची समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला आयपीसी १५३ किंवा जो काही कलम असेल त्यानुसार ताबडतोब अटक केली पाहिजे. समाजात दंगेधोपे आणि तणाव निर्माण करण्याचा या व्यक्तीचा जाणूनबुजून प्रयत्न असतो. हा पहिल्यांदाच केला नाही. यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला आहे.
याचवेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भिडे यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा, आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा थोरात यांनी दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अमरावतीत व्याख्यान सुरू असताना भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह माहिती एका पुस्तकात असल्याचा दावा केला. तसेच हे पुस्तक दुसऱ्या व्यक्तीला जाहीर वाचन करण्यास दिले. त्यात उल्लेख होता की, गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नाहीत. एक मुस्लिम जमीनदार हे त्यांचे खरे वडील होते.
मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीला पळवून आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला.
संभाजी भिडे यांना यवतमाळमध्ये विरोध केला आहे. सतत काही ना काही वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे गुरुजी यांनी थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडिलांबाबतच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान भिडे गुरुजी शनिवारी यवतमाळमध्ये आले असता त्यांना विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. या विरोध करणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.