मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर भाजप नेते विनोद तावडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तावडे आणि देसाई हे जुने मित्र होते. कर्जाच्या ओझ्यामुळे देसाई यांनी टोकाचे पाऊल उचलले अशी शक्यता आहे. Nitin Desai committed suicide by citing the example of BJP leader Amitabh Bachchan Vinod Tawde art director त्यावर तावडे म्हणाले “मी त्याला बऱ्याच वेळा अमिताभ यांचे उदाहरण देऊन समजावले होते कि त्यांच्यावरही वेळ आली होती पण ते त्यातून निघाले, यातूनही मार्ग निघेल, स्टुडिओ गेला तर पुन्हा उभा करता येईल.”
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा हादरली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज आत्महत्या केली आहे. कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. तसेच अनेक कार्यक्रमांच्या आयोजनातही त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पडली.
जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा!’ असं म्हणत विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे.
भारताने प्रचंड ताकदीचा आणि प्रतिभेचा कलावंत आज गमावला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!!! असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
मी काही दिवसांपूर्वीच नितीन देसाई यांच्याशी बोललो होतो, परंतु त्यांच्या निधनाचं वृत्त समजल्याने वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते विनोद तावडे यांनी दिली आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचं उदाहरण देत मी एकदा नितीन देसाई यांना समजावलं होतं, असंही तावडे यांनी म्हटलं आहे.
विनोद तावडे आणि नितीन देसाई यांचे अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहे. अनेकदा दोघांनी मुंबई तसेच पुण्यात एकमेकांसोबत गप्पागोष्टी केलेल्या आहे. परंतु आज सकाळी नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओत अचानक आत्महत्या केल्याच्या घटनेने विनोद तावडे व्यथित झाले आहे.
जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! pic.twitter.com/XPglciNmQC
— Vinod Tawde (Modi Ka Parivar) (@TawdeVinod) August 2, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
माध्यमांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, मी अनेकदा नितीन देसाईंशी बोलून त्यांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत होतो. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनादेखील अपरिमित नुकसान सोसावं लागलं होतं. परंतु तरीदेखील त्यांनी आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी करून दाखवल्या, असं नितीन देसाई यांना अनेकदा सांगितल्याचं विनोद तावडेंनी म्हटलं आहे. कर्जामुळे स्टुडिओ गेला असता तर तो नव्याने सुरू करता आला असता. काही दिवसांपूर्वीच मी नितीन देसाई यांच्यासोबत बोललो होतो, आता त्यांच्या मृत्यूबद्दल ऐकून वाईट वाटल्याची प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे.
नितीन देसाई यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना 4 चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास या सिनेमांसाठी सर्वोत्तम कला दिग्दर्शक म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 1942: अ लव्ह स्टोरी, खामोशी व देवदास चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
आत्महत्येचे खरे कारण समोर आले नाही. मात्र त्यांच्यावर 249 कोटी रुपयांचे कर्ज होते, असे वृत्त आहे. त्यामुळे त्यांनी आर्थिक विवंचनेतून टोकाचा निर्णय घेतला का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अशात त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. मिट्टी से जुडे हैं… मिट्टी के लिये लडे थे.. देखिये महाराणा प्रताप की असीम बहादुरी की कहानी असे म्हणत हॉटस्टारवर येणाऱ्या व महाराणा प्रताप यांच्यावरील वेब सीरिजचा टिझर त्यांनी 26 जानेवारी रोजी पोस्ट केला होता. हीच त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट ठरली आहे.
सिनेमाचे इतके सुंदर चित्र बनवणाऱ्या नितीन देसाईंनी स्वतःचे इतके विदारक चित्र का साकारले हे पाहणे अत्यंत कठिण आहे, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलेले हे सर्वांच्या मनाला वेदना देणारे आहे. देसाई हे एक लढवय्या होते ते असे काही करतील असे कधी वाटले नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेते सुबोध भावेंनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बालगंधर्ववरील कामाच्या आठवणी सांगितल्या.
मराठी दिग्दर्शक अभिजीत पानसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अभिजीत पानसे म्हणाले, “मला खरंच काही सुचत नाहीये, अगदी गलबलायला झालं आहे. आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं हे नुकसान आहेच पण वैयक्तिकरित्या माझं खूप मोठं नुकसान झालं आहे. नितीन दादाने असं का केलं मला माहिती नाही, मला आत्ता खरंच काही सुचत नाहीये” असे ते म्हणाले.
नितीन देसाई हे उत्कृष्ट कला दिग्दर्शन होते. कला दिग्दर्शनासोबत त्यांचे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2003 मध्ये मुंबईतील शिवाजी पार्कवर सभेसाठी आले होते. यावेळी या सभेचा मंच त्यांनी तयार केला होता. त्यावेळी मोदींनी देसाईंनी साकारलेल्या कमळातून एंट्री घेतली होती.
● नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेले सिनेमे
नितीन देसाई यांनी आज आत्महत्या केली. त्यांनी पुढील चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. – परिंदा, 1942 : अ लव्ह स्टोरी, अकेले हम अकेले तुम, विजेता, खामोशी, माचिस, आर या पार, इश्क, करिब, सलाम बॉम्बे, हम दिल दे चुके सनम, बादशाह, मेला, जंग, जोश, मिशन काश्मिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजू चाचा, देवदास, द लिजेंड ऑफ भगतसिंग, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, दोस्ताना, बालगंधर्व,
पानिपत.