सोलापूर : पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही भिडे गुरुजींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक कार्यक्रम करत पोलिस ठाण्यासमोर गोंधळ घातल्याप्रकरणी धारकरी, समर्थकांसह तब्बल 62 जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. A case has been registered against 62 people along with supporters of Sambhaji Bhide Guruji.
पुरुषोत्तम कारकल, सुधीर बहिरवडे यांच्यासह प्रमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. काहींना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
ओंकार बालाजी सराटे (वय-२३,रा. दमाणीनगर), साईप्रसाद अवधूत दोषी (वय-३५, रा. शिवाजीनगर, मोदी), दिनेश मनोज मैनावाले (वय-१९, रा. लष्कर लोधी गल्ली), विशाल राजू जाधव ( वय-२१,रा. इंदिरानगर झोपडपट्टी), अभिषेक बसवराज नागराळे (वय-२३, रा. लष्कर बेडरपूल), किरण रणजित पंगडूवाले (वय-२८,रा.निराळे वस्ती), चंद्रकांत शिवशरण नाईकवाडे (वय-३९,रा.भवानी पेठ), संभाजी उमेश अडगळे (वय-३४, रा.मड्डी वस्ती), प्रेम विश्वनाथ भोगडे (वय-२४,रा.जोधळे अपार्टमेंट), अविनाश बाबूसिंग मदनावाले (वय-२३,रा.लष्कर), नागेश सुभाष येडगिरी (वय-३४, रा. शाहीर वस्ती) व इतर ४० ते ५० अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सर्वांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक विकास देशमुख करत आहेत.
○ तीन वर्षापासून परागंदा असलेल्या आरोपीस पकडले, पीडित बालकेला घेतले ताब्यात
सोलापूर : गेल्या तीन वर्षापासून परागंदा असलेला आरोपी व पिडीत बालिकेचा अवघ्या दोन महिन्यात शोध घेवून आरोपीस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून शहरातील रेवणसिद्ध मंदिराजवळ ताब्यात घेतले. विजापूर नाका पोलीस ठाण्यात २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेस संशयीत आरोपी अजय शिवशरण याने कशाचेतरी आमिष दाखवून पळवून नेले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झाला होता.विजापूर नाका पोलीस ठाणे कडील तपासीक अंमलदार यांनी तपास करून देखील आरोपी न सापडल्याने हा गुन्हा दि.३० मे २३ रोजी मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला होता.
त्यामुळे अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाने कसोशिने तपास करून आरोपी नामे अजय दत्तात्रय शिवशरण (रा.सोरेगाव, सोलापूर) यास रेवणसिद्धेश्वर मंदिर शेजारील महात्मा गांधी प्राणी संग्रालयाजवळ सोलापूर येथून शिताफीने शोध घेवून त्यांना विजापूर नाका पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
हि कामगीरी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षा कडील पो.नि महादेव राऊत पो.ह.महादेव बंडगर,तृप्ती मंडलिक,रमादेवी भुजबळ,उषा मळगे,सीमा खोगरे,पो.ह. गायकवाड,पाटील यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.
● अल्पवयीन बहिणीला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी सावत्र भावासह पाच जणांवर गुन्हा
सोलापूर : घरी येऊन शिवीगाळ करत अल्पवयीन बहिणीला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी सावत्र भावांसह पाच जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलीच्या वडिलांना दोन पत्नी आहेत.
पीडितेच्या आईच्या नावाने जागा असून ती जागा दुसऱ्या पत्नीच्या मुलांच्या नावावर करण्यासाठी वडील हे पीडितेच्या आईला मारहाण करत त्रास देत होते. अशाच प्रकारे ३१ जुलै रोजी रात्री पीडितेचे वडील व दोन सावत्र भाऊ आणि दुसऱ्या आईचे नातेवाईक हे घरी येऊन पीडितेच्या आईला शिवीगाळ करत मारहाण करू लागले.
यामुळे मध्यस्थी करताना पीडितेला आरोपींनी लज्जा वाटेल असे कृत्य केले.तसेच केस केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून पीडितेचे वडील,सावत्र भाऊ व नातेवाईकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.