Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री विठ्ठलाचे जलद दर्शन घडवण्यासाठी पैसे मागणाऱ्या बडवे, उत्पातावर 420 चा गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

श्री विठ्ठलाचे जलद दर्शन घडवण्यासाठी पैसे मागणाऱ्या बडवे, उत्पातावर 420 चा गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/08/04 at 9:00 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

पंढरपूर : विठ्ठलाचे जलद दर्शन घडवून भाविकांकडून पैसे घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सागर बडवे व शंतनु उत्पात (दोघे रा. पंढरपूर) यांच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A case of 420 has been registered against Badwe, Utpata, who asked for money for quick darshan of Shri Vitthala, Pandharpur Solapur Pudalwad

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 पांडुरंगाच्या दर्शनासाठी पैसे उकळणा-या मंदिर प्रशासनाकरून दोन एजंटची चौकशी

 

या बडवे व उत्पात यांनी तुळशीपुजेचे निमित्त करून समितीचे व्यवस्थापकांची भेट घेतली अन् महिला सुरक्षा रक्षक यांना रावसाहेबांनी दोन इसमांना दर्शनास सोडण्यास सांगितले आहे. असे खोटे सांगुन दोन इसमांना दर्शनास सोडण्याचा प्रयत्न करुन समितीच्या कर्मचाऱ्याची फसवणूक केली आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर समितीचे सुरक्षा रक्षक विभाग प्रमुख चंद्रकांत धर्मान्ना कोळी (वय ५६) हे २ ऑगस्ट रोजी मंदिरात काम करत असताना सकाळी अकरा वाजता मंदिर परिसरात राहणारे सागर बडवे व शंतनु उत्पात हे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे आले.

 

त्यापैकी सागर बडवे हा व्यवस्थापक पुदलवाड साहेब यांच्या केबिनमध्ये जाऊन समोरील लोकांना तुळशीपुजा करावयाची आहे. असे सांगितल्याने पुदलवाड यांनी त्यांना नित्योपचार विभागाकडून तुळशी पुजा करावयाची परवानगी घेण्यास सांगितले. तुळशीपुजेची पावती न करता सागर बडवे व शंतनु उत्पात हे विठ्ठल सभा मंडप येथे दोन इसमांना घेऊन आले.

 

महिला सुरक्षा रक्षक प्रज्ञा वट्टमवार यांना सांगितले की, रावसाहेबांनी या दोन इसमांना दर्शनास सोडण्यास सांगितले आहे. असे सांगून त्यांनी त्या दोन इसमांना दर्शनरांगेत प्रवेश दिला. ते दोन इसम आतमध्ये गेल्यानंतर तो प्रकार सीसीटीव्ही कर्मचारी प्रकाश पाटील यांचे लक्षात आल्याने बीडीडीएस पोलीस कर्मचारी वामन यलमार, महिला सुरक्षा कर्मचारी प्रज्ञा वट्टमवार या सर्वांनी मिळुन त्यांना दर्शनाला न सोडता परत कार्यालयात आणुन व्यवस्थापक पुदलवाड यांच्या समक्ष त्यासर्वाकडे विचारपुस केली. यावेळी तुळशी पुजेचे नाव पुढे करुन त्यांच्यासोबत असलेले इसम हे व्हीआयपी नसताना व तुळशीपुजेची अधिकृत परवानगी न घेता त्यांना लोभापोटी दर्शनास सोडण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

 

याबाबत अधिक चौकशी केली असता दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या इसमांची नावे विनोद उपुतला व शिरीशा विनोद उपुतला (रा. चिंतल राज्य हैदराबाद) अशी असुन त्यांनी प्रत्येकी १ हजार रुपये दर्शनासाठी असे एकूण २ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे सांगितले आहे. या घडले प्रकाराची पुदलवाड यांनी पुर्ण खात्री केली. यानंतर चंद्रकांत कोळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 पांडुरंगाच्या दर्शनासाठी पैसे उकळणा-या मंदिर प्रशासनाकरून दोन एजंटची चौकशी

 

सोलापूर – श्री विठ्ठल रुक्मिणीचे झटपट दर्शन करून देण्यासाठी भाविकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना मंदिर समिती प्रशासनाने रंगेहात पकडले असून त्यांची अधिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

सध्या अधिक महिना असल्यामुळे तीर्थक्षेत्र पंढरीत रोज दीड लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्शनास पाच तासाहून अधिक वेळ लागतो. याचाच फायदा घेऊन शहरात झटपट दर्शन देणारे एजंट सक्रिय झाले आहेत.

दरम्यान हैदराबाद येथील तीन भाविक मंदिरा नजीक असणाऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामास होते. यावेळी त्यांनी देवाच्या झटपट दर्शनाची सोय आहे का अशी चौकशी केली असता त्यांना एका तरुणाचा संपर्क क्रमांक मिळाला. सदर एजंटने शॉर्टकट दर्शनासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये रक्कम ठरविली. त्यानुसार सदर एजंट व त्याचा दुसरा साथीदार भाविकांना घेऊन मंदिरात आले असता मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व पोलीस कर्मचारी वामन यलमार यांना या दोन तरुणांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पुदलवाड व यलमार यांनी त्यांच्यावर नजर ठेवून दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले, तेव्हा या दोघांनी भाविकांना झटपट दर्शन देण्यासाठी पैसे ठरविले असल्याचे कबूल केले.

याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अधिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र सदर एजंटना मंदिरामधून कोणाची मदत मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #case #420 #registered #Badwe #Utpata #whoasked #money #quick #darshan #ShriVitthala #Pandharpur #Solapur #Pudalwad, #श्रीविठ्ठल #जलद #दर्शन #पैसे #बडवे #उत्पात #420 #गुन्हा #दाखल #सोलापूर #पंढरपूर #पुदलवाड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ध्रुव हॉटेलच्या मालकाची गोळी झाडून आत्महत्या
Next Article मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?