सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या तब्बल २० कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कारवाईचा बडगा उचलला असून वर्षानु वर्ष प्रति नियुक्तीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. Bardga Solapur Solapur Avhale action against as many as 20 employees of Zilla Parishad
ही कारवाईची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. त्यांची सेवा मुळ ठिकाणी वर्ग करण्यात आली असून प्रतिनियुक्त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आस्थापनेत परिच्छेद लागल्याची बाब निदर्शनास आल्याने रद्द करण्यात आल्याची माहीती पत्रकार परिषदेत दिली.
या वीस कर्मचाऱ्यांमध्ये आर. पी. देशपांडे, ए. एन. भोसले, आर. एस घोडके, प्रदिप वि.सगट, एम.एस. काशेटटी, जी.टी. रेवे, पी. एन. मोरे, व्ही.आर. रणदिवे, एस. के. पोतदार, ए. व्ही. माळी, आर. के. गुरव, व्ही. एन. गाडे, एम. डी. चिंचोळे, एस. एस. माने, खदीरपाशा खाजानुर सय्यद, पाटील अनिल ज्ञानेश्वर, रविकांत भिमराव कोरे, सचिन एल. घोडके, एस.पी.बाणुर, प्रदीप सगट यांचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अनेक असे कर्मचारी आहेत की ज्यांची सेवा एका ठिकाणी असताना ते मूळ ठिकाणी न थांबता प्रतिनियुक्तीवर आपल्या सोयीच्या ठिकाणी कामकाज करत आहेत, विभागीय आयुक्तांच्या परवानगी न घेता परस्पर पद्धतीने या कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी पदभार घेताच केवळ एका महिन्याच्या आतच ही कारवाई सुरू केली आहे .
आता त्यांचे लक्ष आहे आरोग्य आणि बांधकाम विभागाकडे . प्रतिनियुक्ती रद्द केल्याने संबंधित विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवणार आहे. मात्र यापुढे विभागीय आयुक्तांच्या परवानगीनेच प्रतिनियुक्ती देण्यात येणार असून ज्या कर्मचाऱ्यांची तक्रार नाही. अशांनाच नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजूनही अशा प्रकारचे कर्मचारी असल्याचे बोलले जात आहे परंतु मी शेवटपर्यंत याबाबतचा पाठपुरावा करणार असल्याचे आव्हाळे यांनी सांगितले.