सोलापूर : सोलापूर शहरात आजच्या अहवालानुसार मंगळवारी तब्बल 1 हजार 458 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये फक्त 39 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील बळी संख्या 403 पोहचलीय. एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 6 हजार 382 झाली आहे.
मंगळवारी 39 कोरोनाग्रस्ताची भर पडली आहे. तब्बल 88 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 45 पुरूष आणि 43 महिला रूग्णांचा समावेश आहे. यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या शुक्रवार पेठेतील 62 वर्षाच्या पुरूषाचा आणि गंगामाई हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या हत्तुरे वस्ती परिसरातील 65 वर्षाच्या पुरूषाचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण कोरोना बाधितांची 6 हजार 382 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 725 तर 2 हजार 657 महिला रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 403 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 270 तर महिला 133 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगळवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 1 हजार 458 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 419 अहवाल निगेटिव्ह तर 39 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 58 हजार 210 जणांची तपासणी केली आली. त्यामध्ये निगेटीव्ह 51 हजार 828 तर 3 हजारा 682 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 35 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 944 झाली आहे.