○ घटनेत अशी तरतूद नसल्याचे सांगत शिंदे यांनी वादावर टाकला पडदा
सोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वीच सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसमध्ये दोन जिल्हाध्यक्षांच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली.Two District Presidents; The spark of controversy in the city-district Congress, Sushilkumar Shinde cast a curtain on the issue of Solapur मंगळवारी वरिष्ठ उपाध्यक्षांसह सात तालुकाध्यक्षांनी एकत्रित येऊन दोन जिल्हाध्यक्ष मागणी करणाऱ्या शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या यांनाच ताकीत द्यावी अशी मागणी केली. दरम्यान, या सर्वांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी पक्षात लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र काँग्रेसच्या घटनेमध्येच दोन जिल्हाध्यक्षांची तरतूद नाही, तसे काही होणार नसल्याचे सांगत वादावर पडदा टाकला. दरम्यान डॉ. धवलसिंह मोहिते-पाटीलही सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत.
नुकतेच पुणे येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली. यात सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी जिल्ह्यात इतर पक्षांप्रमाणे दोन जिल्हाध्यक्ष सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी नेमावे, अशी मागणी केली होती.
त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्यासह सात तालुकाध्यक्ष आणि पंधरापेक्षा जास्त पदाधिकारी एकत्रित आले.
त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना जिल्हाध्यक्ष संबंधी मागणी करण्याचा अधिकार काय, काँग्रेसची देशभर एकच कार्यपद्धती आहे एका जिल्ह्यात एकच जिल्हाध्यक्ष असताना सोलापूरबाबत अशी दुहेरीची भूमिका त्यांनी का घेतली असा सवाल करत चुकीच्या पध्दतीने ही मागणी करणाऱ्या चेतन नरोटे यांना वरिष्ठांनी ताकीत द्यावी, अशी मागणी केली.
सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते पाटील गटामध्ये समन्वय येत आहे तसेच शहर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला असून येत्या निवडणुकीत यश येणार हे निश्चित असताना अशा मागण्या म्हणजे कोणालातरी मोहिते पाटील आणि शिंदे एकत्रित येऊ नये अशी पोटदुखी असावी असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला.
नरोटे यांनी शहर काँग्रेसची जबाबदारी नीटपणे सांभाळावी शहरात काँग्रेस वाढवावी, अन्य मुद्धात लक्ष घालू नये नरोटे असेही पदाधिकारी म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या पत्रकार परिषदेस वरिष्ठ उपाध्यक्ष विजय हतुरे, विविध तालुक्यांचे अध्यक्ष अॅड. अभिषेक कांबळे, प्रताप जगताप, अमर सूर्यवंशी, सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, सतीश पाचपुडवे, हनुमंत मोरे, पदाधिकारी भीमराव मोरे, विष्णु शिंदे, दादा पवार सुनिता अवघडे, भीमराव बाळगे बाबुराव पाटील उपस्थित होते.
○ तालुकाध्यक्षांनी गैरसमज करून घेऊ नये : शिंदे
मंगळवारी सायंकाळी या सर्व पदाधिकाऱ्यांनी जनवात्सल्यवर माजी गृहमंत्री शिंदे यांची भेट घेत आपले म्हणणे मांडत नाराजी व्यक्त केली. यावर शिंदे यांनी काँग्रेसच्या घटनेमध्येच दोन जिल्हाध्यक्ष करण्याची पद्धत नाही. हे होणे शक्य नाही. ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी गैरसमज न करता निवडणुकीच्या कामाला लागावे, असे सांगत या वादावर पडदा टाकला.
○ शहर पदाधिकारी बाहेर; ग्रामीणचे आत
ग्रामीणचे पदाधिकारी जनवात्सल्यवर आले होते. त्यावेळी शहराचे पदाधिकारी तेथे उपस्थित होते. मात्र वातावरण पाहून शिंदे यांनी शहराच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर बसण्यास सांगितले तर ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांना आतमध्ये घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत वादावर पडदा टाकला.
○ मी मत मांडले; निर्णय पटोले आणि शिंदेसाहेब घेतील तो मान्य : नरोटे
पुणे येथील बैठकीत सोलापूर लोकसभा जिंकण्यासाठी काय आवश्यक आहे, याबाबत विचारल्यावर मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापुढे मत मांडले आहे, तो मला अधिकार आहे. ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी मिडीयासमोर जाण्याची गरज नव्हती. मी माझे मत मांडले आहे. दोन जिल्हाध्यक्ष करायचे की नाही याचा निर्णय प्रदेश घेईल. नाना पटोले आणि सुशीलकुमार शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य आहे. अनेक पक्ष बदलणाऱ्यांनी माझ्यात आणि डॉ. धवलसिंहांमध्ये गैरसमज करून देऊ नये, मी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली नाही. सोलापूर आणि माढा दोन्ही लोकसभेसह मंगळवेढा-पंढरपूर आणि शहर उत्तर विधानसभा काँग्रेसने जिंकावी यासाठीच आपण मत मांडल्याचे शहराध्यक्ष चेतन नराटे म्हणाले..