Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोकाट जनावरांचा लिलाव हाेणार; महापालिकेचा निर्णय, कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मोकाट जनावरांचा लिलाव हाेणार; महापालिकेचा निर्णय, कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु

Surajya Digital
Last updated: 2023/10/13 at 8:43 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

साेलापूर : महापालिकेच्या कुमठा नाका येथील काेंडवाड्याची क्षमता वाढविण्याचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अतिरिक्त आयुक्त निखिल माेरे यांना दिले आहेत. पालिकेने जप्त केलेली जनावरे गाेशाळेत पाठविण्यात येतील अन्यथा जनावरांचा लिलाव जाहीर हाेणार आहे. There will be an auction of free animals; Decision of Solapur Municipal Corporation, sterilization of dogs started in Nandurbar Makta

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 शहरातील मोकाट व भटके कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु

 

शहरातील मुख्य रस्त्यावर माेकाट जनावरे बसलेली असतात. या जनावरांमुळे अपघात हाेण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी पालिकेकडे येतात. महापालिकेचे पथक ही जनावरे जप्त करून कुमठा नाका येथील काेंडवाड्यामध्ये आणते. जनावरांचे मालक किरकाेळ दंड भरून जनावरे घेऊन जातात आणि पुन्हा रस्त्यावर साेडून देतात. मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या करावाईतील दंड वाढविण्याचा निर्णय घेतला. ११ ऑक्टाेबरपासून छाेटी जनावरे साेडवून नेण्यासाठी २ हजार, तर माेठ्या जनावरांसाठी ५ हजार रुपये दंड हाेणार आहे. वारंवार ज्यांची जनावरे जप्त हाेतात त्या जनावरांचा जाहीर लिलाव हाेईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 शहरातील मोकाट व भटके कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्यामार्फत जुना जकात नाका अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ समोर सोलापूर – पुणे रोड येथे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मोकाट व भटके श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण उपक्रम राबविण्याकरीता नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार ही शासन पुरस्कृत संस्थेला उपरोक्त कामाकरिता मक्ता देण्यात आलेला आहे.

उपरोक्त काम सन 2026 पर्यत सातत्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. महापालिकांनी कुत्रे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्याकरिता महापालिके तर्फे मार्च 2024 पर्यंत सुमारे 3200 कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक भागात कुत्रे घोळक्याने फिरत असतात. त्यामुळे अनेक वाहन धारकांना व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कुत्र्यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महानगरपालिकेने निविदा प्रक्रियाअंती नंदुरबार येथील संस्थेला निर्बिजीकरणाचा मक्ता दिला आहे. कुत्र्यांना पकडून त्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने निर्बिजीकरण व लसीकरण करुन त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास कार्यालयीन अधिक्षक म.गांधी प्राणीसंग्रहालय तसेच मक्तेदार यांच्या कडून हेल्पलाईन क्रमांक 7666513026 जारी करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #auction #freeanimals #animals #Decision #SolapurMunicipalCorporation #sterilization #dogs #started #Nandurbar #Makta, #सोलापूर #मोकाट #जनावर #लिलाव #महापालिका #निर्णय #कुत्र्यांचे #निर्बिजीकरण #नंदुरबार #मक्ता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युवा शेतकऱ्याची यशोगाथा : सोलापूरच्या केळीची आखाती देशात निर्यात
Next Article मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग तयार करूनही आरक्षण देऊ शकता : मनोज जरांगे-पाटील 

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?