जालना : 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मी एवढ्या टोकाचे आमरण उपोषण करणार की एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर विजययात्रा निघेल. 22 ऑक्टोबरला पुढच्या आंदोलनाची दिशा पत्रकार परिषद घेऊन ठरणार आहेत. Antarvali Sarati ‘You can give reservation to Maratha community even by creating a separate category: Manoj Jarange-Patil 10 दिवसांत आरक्षण द्या अन्यथा पुढील सर्व जबाबदारी सरकारची असेल, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावातील सभेतून केला आहे. त्यांनी दिलेल्या शब्दांचे सरकारचे टेन्शन वाढले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा. आम्हाला महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल. पण एनटी व्हिजेएनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार. नाही तर ५० टक्क्याच्यावर घेणार नाही.
मराठा आरक्षणाची स्थापना करण्यात आलेल्या समितीचं काम बंद करा. चार दिवसात कायदा पारित होणार नाही. एक महिन्याचा काळ द्या असं तुमचं आमचं ठरलं होतं. आता ५ हजार पानांचा पुरावा मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन कुणबी समाजात समावेश करून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
राज्य सरकारविरोधात आज मनोज जरांगे पाटील यांनी विराट सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी केली. या सभेस जाण्यासाठी आज सकाळपासून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. काहीजण तर या ठिकाणी शुक्रवारपासून मुक्कामी होते. सभेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहे.
अंतरवाली सराटीत येथे आज मराठा आरक्षणासाठी जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी आरोग्य यंत्रणेकडून आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी पाच रुग्णवाहिका, 25 वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 30 ते 35 परिचारिका उपस्थित आहेत. तसेच गरज भासल्यास अंबड उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांची व जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 खाटांची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारवर अंतरवाली सराटी गावातील सभेतून धक्कादायक आरोप केला आहे. ‘हे सरकार मराठा बांधवांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्यासाठी – त्यांच्याकडून काही लोकांना बोलण्यासाठी समोर केले जात आहे. गुणरत्ने आणि भुजबळांना उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावा,’ -असे ते म्हणाले. माझे फेसबुक अकांऊट दोन तासापासून बंद करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
जालन्यातील सराटे अंतरवाली येथे आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. ही सभा जवळपास 100 एक्करवर होणार आहे. यासाठी 5 ते 6 लाख मराठा बांधव येण्याची शक्यता असून 30 हजार ते 35 हजार वाहने देखील दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत महामार्ग धुळे-सोलापूर महामार्ग बीड ते छत्रपती संभाजीनगर एवढा बंद राहील असे बीड पोलीस अधिक्षकांनी सांगितले.
मनोज जरांगे- पाटील यांच्या विराट सभेला सुरूवात झाली आहे. जालन्याच्या आंतरवाली सराटी गावात 100 एकर जागेवर ही सभा होत असून या सभेला ‘गरजवंत मराठ्यांचा लढा’ असे नाव देण्यात आले आहे. यातून ते काय भुमिका मांडणार आहेत. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या सभेला रात्रीपासून लोक सभास्थळी दाखल होत आहेत. 6 लाखांपेक्षा जास्त मराठा बांधव या सभेसाठी दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी गावात सभा होत आहे. यामध्ये जरांगे- पाटील यांनी सरकारपुढे काही मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये त्यांनी मराठा समाजाला 50 टक्क्यांचा वेगळा प्रवर्ग करून 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण दिले तरी चालेल, असे मागणी केली आहे. पण एनटी, व्हीजेएनटीचा जसा प्रवर्ग टिकला तसे टिकाऊ आरक्षण द्यावे, अन्यथा ते आरक्षण घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारला मी विनंती करीत आहे की, त्यांनी खालच्या कार्यकर्त्यांना पुढे करुन मराठ्यांना विरोध करुन नये, सदावर्ते यांनी एकदा सुट्टी दिली आहे. तेच आमच्या विरोधात कोर्टात गेले होते. आता मला ते अटक करण्याची मागणी करत आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज द्यावा, तसेच भुजबळांनाही अजित पवारांनी समज द्यावा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
○ मनोज जरांगे-पाटलांच्या प्रमुख मागण्या
→ मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा.
• कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या.
• मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांच्या कुटुंबातील लोकांना निधी, सरकारी नोकरी द्या.
→ दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या OBC बांधवांचा सर्वेक्षण करावा. सर्व्हे करून प्रगत जाती बाहेर काढाव्यात.
• सारथी संस्थेमार्फत PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी द्यावा.