मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. त्यातच आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी धक्कादायक माहिती दिली. So far 48 people sacrificed for Maratha reservation, Manoj Jarang’s reaction on suicide! Jarange-Patil Sunil Kawle मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 48 जणांनी बलिदान दिले आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच राज्य सरकारला कधी जाग येणार असेही त्यांनी विचारले. दरम्यान, सुनील बाबुराव कावळे यांनी आज आत्महत्या करत जीवन संपवले. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
जालन्यातील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी आत्महत्या केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत प्रतिक्रिया दिली. ‘सरकारने मराठा आंदोलकांचे बळी घ्यायचं का ठरवलंय कळत नाही. सरकारमुळेच आमचे बळी पडायला लागलेत, मराठा समाजाला मी हातपाय जोडून आवाहन करतो की आपल्याला आरक्षण मिळणार आहे, आपण घेतल्याशिवाय सोडणार नाही, सरकारने तातडीने आरक्षण द्यावे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेल्या 45 युवकाने आत्महत्या केली आहे, अशी माहिती मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटलांनी दिली आहे. सुनील बाबुराव कावळे असे या युवकाचे नाव आहे. तो युवक जालन्यातील अंबडमधील असल्याची माहिती आहे. त्यांचे काही मराठा आरक्षण संदर्भातील व्हॉटसअॅप चॅट समोर आले आहे, असे मराठा समन्वय विरेंद्र पवारांनी म्हटले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावरून मोठे विधान केले आहे. मराठा आणि कुणबी याच्यात फरक आहे. मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करावा. जातीला किंवा वर्गाला आरक्षण देताना घटनेचा अभ्यास करावा लागतो. मी भरपूर अभ्यास केला आहे, त्यामुळे मला माहिती आहे. घटना काय सांगते. मी मराठा आहे, मला कुणबी प्रमाणपत्र नको. कुठलाही मराठा, कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असे राणे म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कावळे यांच्याकडे मृत्यूपूर्वी लिहिलेली चार पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यात त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देत असल्याचे म्हटले आहे. शिवाय आता माघार नाही, एकच मिशन मराठा आरक्षण, कोणी काहीही बोलू द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचे नाव तोंडातून काढू नका. आता फक्त आणि फक्त मराठा आरक्षण. या 24 ऑक्टोबरला मराठा आरक्षण दिवस, या मुंबईत या, पण लक्षात ठेवा शांततेत यायचं असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. कावळे यांनी आतापर्यंत झालेल्या सर्व मराठा आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला होता. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका होती आणि त्याचसाठी त्यांनी बलिदान दिले असे सुनील कावळे यांचा मुलगा नागेश याने सांगितले. मराठा आरक्षण मिळाले तरच माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती लागेल असेही तो म्हणाला. कावळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मला मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही. मी हार, तुरे स्विकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गावागावात फिरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या.
मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे. मायबापाच्या शब्दापुढे नाही. आपल्या वाट्याला कष्ट आले परंतु लेकरांच्या वाट्याला हे नको. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे. मराठा आरक्षण समाजाने समजून घेण गरजेचं आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की पुरावे लागतात. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने वेळ एक महिन्यांचा वेळ मागितला. सरकारला आपण चाळीस दिवसांचा वेळ दिला. आपण मुदत दिल्यानंतर हालचालीनंतर वेग आला आहे.