□ लक्ष्मी टाकळीच्या सरपंचपदी संजय साठे बिनविरोध, उपसरपंचपदी महादेव पवारही बिनविरोध
पंढरपूर : पंढरपूर शहरालगतच्या टाकळी ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे. The saffron of the Shinde group flew over Pandharpur’s Takli Gram Panchayat सरपंचपदी शिवसेनेचे संजय साठे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी महादेव पवार यांची निवड करण्यात आली. राज्यातील महायुतीचा थेट प्रत्यय या निवडणुकीत दिसून आला आहे. या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे निष्ठावंत सोलापुर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांचे बंधु संजय साठे यांची तर उपसरपंचपदी भाजप परिचारक गटाचे महादेव विठ्ठल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यातील महायुतीचा थेट प्रत्यय या निवडणुकीत दिसून आला आहे.
या १७ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी लक्ष्मी टाकळी येथे पार पडली. यामध्ये वरील दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच आणि उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रिगण चव्हाण यांनी जाहीर केले.
या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत परिचारक गटाचे नेते जिल्हा परिषद रामदास ढोणे यांच्या गटाचे ७ तर महेशनाना साठे यांच्या गटाचे ४ सदस्य तर विरोधी गटाला उर्वरित जागा मिळाल्या होत्या. यामध्ये भाजप आणि सेना अशी युती करीत सुरुवातीला भाजपला सरपंच आणि सेनेला उपसरपंच पद दिले होते. यानंतर आता सेनेला सरपंच आणि भाजपला उपसरपंच देऊन राज्यात असलेल्या महायुतीचा प्रत्यत लक्ष्मी टाकली ग्राम पंचायतीत पहावयास मिळाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यात सत्ता बदल होऊन मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान होताच पहिल्याच फेरीत आषाढी एकादशीचा मान मिळाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील सेनेचा पहिला मेळावा महेशनाना साठे यांनी घेतला होता. काही दिवसातच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यावेळी पंढरपूर लगत असलेली ग्रामपंचायत महायुतीला मिळाली. आता तर थेट मुख्यमंत्री गटाला साठे बंधू यांच्या प्रयत्नाने सरपंचपद मिळाले आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत वादात न पडता आपले पक्ष वाढीचे काम करून दाखवीत थेट महेशनाना साठे यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावून दाखविला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नजरेत अजून भक्कम स्थान निर्माण झाले आहे.
निवडीचे वेळी माजी सरपंच विजयमाला वाळके, नागरबाई साठे, आशाबाई देवकते, औदुंबर ढोणे,नंदकुमार वाघमारे, रेश्मा साठे, रोहिणी साठे, रुपाली कारंडे, सागर सोनवणे, हे सदस्य उपस्थित होते. सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड होताच जल्लोष साजरा करून सत्कार करण्यात आले. यावेळी रामदास ढोणे, महेशनाना साठे, सचिन वाळके, यांच्यासह परिचारक गट आणि साठे गटाचे अनेक समर्थक उपस्थित होते.
□ नगरपंचायतची वचनपूर्ती करणार : सरपंच संजय साठे
पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही सेनेतर्फे या टाकळी ग्रामपंचायतीला विविध विकास कामाबरोबरच आपल टाकळी गाव नगरपंचायत करू असे जाहीरनाम्यात नमूद केले होते. त्याचा जलद पाठपुरावा करून लक्ष्मी टाकळी लवकरच नगरपंचायत करून दाखविणार असल्याचे नूतन सरपंच संजय साठे यांनी जाहीर केले आहे.
¤ ऊसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात साखर हंगाम सुरु करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह होते. परंतु आता याबाबत अखेर निर्णय झाला आहे.