○ आठ लाख कागदपत्रांची तपासणी, २४ हजार २७ पुरावे आढळले
सोलापूर : राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 57 हजार 688 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. How many Kunbi records were found in which district? Maratha Kunbi caste records for evidence at war level Solapur त्यापाठोपाठ जळगावात 45 हजारापेक्षा जास्त, धुळ्यात 31453, सांगलीत 2211, छत्रपती संभाजीनगर 932, जालना 2764, परभणी 1466, हिंगोली 3130, बीड 3994, नांदेड 389, लातूर 363, धाराशिव 459, कोल्हापूर 5566, रत्नागिरी 69, पुणे 20000, सोलापूर 2187 कुणबी नोंदी सापडल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात मराठा कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती कक्षातील अधिकाऱ्यांनी कक्षाची स्थापना झाल्यापासून आज अखेर ७ लाख ८४ हजार कागदपत्रांची तपासणी केली आहे. यामध्ये २ हजार ४२७ कुणबी नोंदीचे पुरावे आढळून आले आहे. बार्शी तालुक्यात सर्वाधिक १५३४ नोंदी आढळून आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयात कुणबी मराठा जात पुरावे तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हे तपासणीचे काम जोरात चालू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर जिल्ह्यात जन्म मृत्यू आणि महसुली अभिलेख अशा तब्बल सात लाख ८४ हजार कागदपत्राची तपासणी केली आहे. यामध्ये २४४७ नोंदणी आढळून आल्या आहे. बार्शी तालुक्यात सर्वात जास्त १५३४ नोंदणी आढळून आल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, मंगळवेढातील पटवर्धन यांच्या सह अनेक संस्थाने होती या संस्थांनाकडे देखिल कुणबी नोंद असल्याचे बोलले जात आहे. गुरूवारी सकल मराठा समाजाच्या सोलापूर जिल्ह्यातील समन्वयक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात तपासणीची मागणी केली. त्यावर प्रशासनाचे या कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
महसुली अथवा संस्थांनाच्या कागदपत्रांमध्ये असलेल्या नोंदी मोडी लिपीमध्ये आहेत, ही लिपी अवगत असणारे कमी लोक आहे. त्यांचा शोध मराठा समाजाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या मोडी लिपीतील समजणारे भाषा अनुवाद मराठा समाजास देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.