नवी दिल्ली : भारताला सर्व मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात मागील 17 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले होते. त्या सर्वांना बाहेर काढण्यात सरकार आणि प्रशासनाला यश आले आहे. Big success – all 41 laborers came out of the tunnel after 17 days Uttarkashi या सर्व मजूरांना चिन्यालीसोड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना ऋषिकेशला हलवण्यात येण्याची शक्यता आहे.
उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यातून 17 दिवसांपासून अडकलेल्या मजूरांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या बोगद्यातून पहिले 33 मजूर बाहेर आले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मजूर हे बोगद्यातून बाहेर येताना भारत माता की जय, अशा घोषणा देत आहेत. पहिल्या मजूरांचा फोटो समोर आला आहे. ही सर्व भारतासाठी आनंदाची बातमी आहे. सर्व जण मजूरांच्या सुखरुप सुटकेसाठी प्रार्थना करत होते.
सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची सुटका झाली आहे. बचाव मोहिमेच्या यशानंतर पीएम नरेंद्र मोदींनी ट्वीट केल. ‘उत्तरकाशीतील आमच्या कामगार बांधवांच्या बचाव कार्याचे यश सर्वांनाच भावूक करणारे आहे. जे मित्र बोगद्यात अडकले होते. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांच्या धैर्याला मी सलाम करतो,’ अशा भावना त्यांनी मांडल्या.
उत्तराखंड येथील उत्तरकाशीमधील एका बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांपैकी 5 मजूरांना प्रथम बाहेर काढण्यात सरकारला आणि प्रशासनाला मोठे यश आले आहे. बाहेर निघालेल्या मजूरांना घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयाकडे जात आहे. मागील 17 दिवसांपासून ते या बोगद्यात अडकले होते. ऐन दिवाळीच्या दिवशीच या बोगद्यामध्ये हे मजूर अडकले होते. संपूर्ण देश हे मजूर बाहेर येण्यासाठी प्रार्थना करत होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
NDRF कर्मचारी दोऱ्या, सिडी आणि इतर उपकरणे घेऊन जात आहे. वैद्यकीय पथके, रुग्णालये, बेड आणि वाहतूक व्यवस्था अलर्ट मोडवर तयार करुन ठेवण्यात आलेली आहे. सर्वांचे या घटनेकडे लक्ष लागले आहे.
बोगद्यात गेल्या 17 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. या ठिकाणी आजही मदतकार्य सुरु असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पोहोचले. 52 मीटरपर्यंत ड्रिलिंगचे काम पूर्ण झाले आहे आणि 57 मीटरपर्यंत यश मिळू शकते, असे धामी यांनी म्हटले. येथे मॅन्युअल ड्रिलिंग सुरु असून दिल्लीतून 12 लोकांची टीम आली. ती रॅट मायनिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करते.
मजुरांना बाहेर काढण्यासाठी ‘रॅट मायनिंग’ चा वापर केला. अरुंद मार्गातून कोळसा काढण्यासाठी वापरण्यात येणारी ही एक पद्धत आहे. ‘रॅट होल’ एवढा मोठा असतो की त्यातून एक व्यक्ती जाऊन त्यातून कोळसा काढू शकतो. 2014 मध्ये एनजीटीने सुरक्षासंबंधी धोक्यांमुळे ‘रॅट मायनिंग’ पद्धतीचा वापर करण्यावर बंदी घातली होती. दरम्यान आज मजुरांना बाहेर काढले.
○ उत्तरकाशी बोगदा : कोणत्या राज्यातील किती कामगार?
गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं. बांधकामाच्या ठिकाणाहून मुख्य रुग्णालय हे 30 किमीच्या अंतरावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणीच तात्पुरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली.
उत्तराखंड-2
हिमाचल प्रदेश-1
उत्तर प्रदेश-8
बिहार-5
पश्चिम बंगाल-3
आसाम-2
झारखंड-15
ओडिशा-5