○ महाराष्ट्र जिंकण्यासाठी निघालेले मुख्यमंत्री हरले !
सोलापूर : तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांचा BRS पक्ष सत्तेतून बाहेर पडला. त्यांनी फक्त 39 जागा जिंकल्या. कामारेड्डी मतदारसंघातून राव यांचा पराभव झाला. BRS in Telangana’s Havagul, possibility to change political equations in Solapur त्यामुळे महाराष्ट्रात पक्ष विस्तार करणाऱ्या केसीआर यांना आपल्या स्वतःच्या राज्यात सत्ता कायम राखता आली नाही, अशा शब्दात त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे. तसेच महाराष्ट्रात त्यांचा पक्ष विस्तार रखडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस अर्थात भारतीय राष्ट्र समिती या पक्षाला त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसने त्यांचे चांगलेच पानिपत केले आहे. गेली पाच वर्षे असलेली बीआरएसची सत्ता उलटवून टाकली आहे. त्यामुळे केसीआर यांची हवा तेलंगणा मधून गूल झाली आहे.
तेलंगणा बाहेर इतर राज्यांमध्ये आपल्या पक्षाची पायमुळे फिक्स करण्यासाठी केसीआर राव यांनी मोठा झंजावात केला होता. सोलापुरात देखील या ५०० गाड्या घेऊन मोठ्या दिमाखात पक्षाचे लॉन्चिंग केले होते. त्यामुळे सोलापूर शहरात तसेच जिल्ह्यामध्ये अनेक नेते मंडळींनी केसीआर यांच्या बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र तेलंगणातून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केसीआर यांच्या पक्षाचा तेलंगणा राज्यात पराभव झाल्यामुळे आता सोलापुरातील राजकीय समीकरणे देखील बदलणार असल्याची शक्यता आहे.
‘आपकी बार किसान सरकार’ हा नारा देत केसीआर यांनी तेलंगणा नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आपल्या पक्षाची ध्येय धोरणांच्या जोरावर पक्षाचे कार्यक्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न केला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर शहर जिल्ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. पंढरपुरातील अभिजित पाटील यांना पक्षांमध्ये घेऊन मोठा झंजावात केला तसेच आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या भेटीला येऊन तब्बल ५०० गाड्या घेऊन सोलापूर जिल्हामध्ये मोठा झंजावात केला होता. तेलगू समाज त्यांच्या पाठीमागे मोठ्या खंबीरपणे उभा राहिला होता. अनेक तेलुगू बांधवांनी केसीआर यांच्या पाठीमागे राहत त्यांच्या पक्षांमध्ये प्रवेश केला होता. तसेच भाजपाच्या काही शहरातील पूर्व भागाला लक्ष केंद्रित केले. केसीआर यांनी पूर्व भागातील नेते पद्मशाली समाजातील मंडळींना एकत्र करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच साखर पेरणी केली होती. त्यांना यश देखील आले होते.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून देखील भगिरथ भालके यांच्या रूपाने नवा चेहरा बीआरएसला मिळाला होता. तसेच दक्षिण सोलापुरात देखील त्यांनी मोठा झंजावात निर्माण करत दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल १०० ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी थेट तेलंगणा गाठून बीआरएस पक्षाच्या गाडीमध्ये बसून आपला प्रवास सुरू केला होता. भाजपला मोठा धक्का दिला होता.
मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने बीआरएसचा दारुण पराभव केला आहे. काँग्रेसच्या हाती स्पष्टपणे बहुमत आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर बी आर एस पार्टी राहिली आहे. त्यामुळे तेलंगणाच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवून सोलापूर शहर जिल्ह्यातील गेलेल्या गेलेल्या नेतेमंडळींचा आता काय होणार? सोलापुरातील राजकारणातील ही समीकरणे बदलार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीआरएस पक्षाचे प्रवक्ते नागेश वल्याळ यांना विचारणा केली असता त्यांनी राजकारणामध्ये हार जीत होतच राहते सत्ता गेली म्हणून राजकारणापासून दूर राहता येत नाही. सोलापूर शहर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागण्याचे आदेश आम्हाला दिले दिले आहेत. त्यामुळे आम्ही आता सोलापूर शहरात पक्षाच्या माध्यमातून पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे. आम्हाला वेळ देणारी तेलंगणातील नेते मंडळी कमी होती. आता ४० आमदारांकडे वेळच वेळ असल्याचे म्हटले.