पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापुरात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाली आहे. इंदापुरात आज ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पडळकरांनी मराठा समाजाविरोधात भाषण केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. ‘Go back’ slogans, MLA Gopichand Padalkar pelted with slippers Pune Indapur पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. मेळाव्यानंतर पडळकर मराठा साखळी उपोषणाजवळ आले. यावेळी त्यांच्यावर ही चप्पलफेक झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते या सभेला हजर होते.
सभा संपल्यानंतर गोपीचंद पडळकर या सभास्थळाला लागून असलेल्या अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळाला भेट देण्यासाठी गेले. यावेळी तिथे असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्या अंगावर चप्पल फेकली. मराठा आंदोलकांनी यावेळी गो बॅक अशा घोषणा देखील दिल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी ठिकठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडूनही सभा घेतल्या जात आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर आंदोलनस्थळी गेले तेव्हा त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. गोपीचंद पडळकर आता तिथून निघून गेले आहेत.
मागासवर्ग आयोगावर असताना मी अनेक गोष्टी पाहिल्या. आम्ही दाखला काढण्यासाठी गेलो तर तीन माहिने लागतात. पण राज्यात काही दिवसात कुणबी आरक्षणाचे सर्टिफिकेट लगेच दिले जात आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने ऍफिडेवीट कोर्टात सादर केले जात नाही. आयोगाचे सचिव जाणीवपूर्वक हे ऍफिडेव्हीट सादर करत नाहीत. भोसले नामक निवृत्त न्यायाधीश यामध्ये ढवळाढवळ करत आहेत. ओबीसी आरक्षण घालवण्याचा कट सुरु असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
होळकर, आंबेडकर आणि फुले यांना जोडणार धागा म्हणजे यशवंतराव होळकर आहेत. देशातील सर्व चळवळी या होळकर, फुले, आंबेडकर यांच्या आहेत. या चळवलीला ताकद दिली ती छगन भुजबळांनी. त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा”, असं पडळकर म्हणाले. आम्हाला तीन तीन महिने दाखले मिळत नाही आणि तिकडे एक दिवसात दाखले देतायत. अंबडमधील सभेनंतर म्हणाले भुजबळ साहेबांना असे करेल तसे करेल. अरे साहेबांच्या केसाला धक्का लागू देत नाही. रामोशी समाज सोबत आहेत. गावागावात सगळ्यांनी एकत्र या आणि एकजुटीने लढा द्या. प्रस्थापितांच्या घरात पिलावळी भरपूर झाल्या म्हणून यांना ओबीसी आरक्षण पाहिजे. एक कुणबी दाखला दिला तर आमचे सरपंच, झेडपी मेंबर, पंचायत समिती जागा गेली. म्हणून आपले आरक्षण वाचवा आणि लढा द्या”, असं भाषण गोपीचंद पडळकरांनी आज केलं.