बीड : मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेतून सरकारला इशारा दिला आहे. सरकारला पुढचे आंदोलन जड जाणार आहे. मी जीवंत असे पर्यंत मागे हटणार नाही आहे, मी मॅनेज होत नाही. हिच त्यांची डोकेदुःखी आहे. Maratha reservation is absolutely necessary; Manoj Jarange has been on fast to death since January in Mumbai मराठ्यांना संपवण्याचा पर्यंत होत आहे, असे जरांगे सभेत म्हणाले. मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले तरच आरक्षण घेणार, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
बीडमधील निर्णायक सभेत मनोज जरांगे यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे. तयारीला लागा, 20 जानेवारीला मुंबईत मनोज जरांगे आमरण उपोषण करणार आहे, असे जरांगे म्हणाले आहेत. प्रत्येक मराठ्याने मुंबईत उपोषण स्थळी भेटायला यायचे आहे. मुंबईत येताना जो हिंसा करील तो आपला नाही, असेही जरांगे म्हणाले. मनोज जरांगेंनी 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. कायदा सुव्यवस्था, शांतता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्मांना माझे आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणं ही जमेची बाब आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे, असे शिंदे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेतून सर्व आमदार आणि खासदारांना इशारा दिला आहे. जर आंदोलनादरम्यान, कोणत्याही मराठ्याला त्रास झाला तर त्यांच्या माता माऊल्यांनी खासदार आणि आमदारांच्या घरी जाऊन बसा आणि त्यांना जाब विचारा, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. सरकारने आमच्यासोबत गुपचूप राहायचे आहे, असे जरांगे म्हणाले. प्रश्न मार्गी लावा, नाटकं कशाला? असा सवाल जरांगे पाटील यांनी सरकारला केला आहे. सरकार आपल्याला गांभीर्याने घेत नाही, सरकारकडून मराठा समाजाचा अपमान व फसवणूक झाली. जो आपल्या बाजूने, तोच आपला नेता असे मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण घेतल्या शिवाय सुट्टीच नाही. आंदोलन कारायचे पण ते शांततेत, शब्द पाळायचा, मोडायचा नाही, असे ते म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मराठा आरक्षणाचा अल्टीमेटम उद्या संपणार आहे. त्यापूर्वी आज मनोज जरांगे यांची बीडमध्ये निर्णायक सभा होत आहे. या सभेवेळी बोलताना, बीड जिल्ह्यामध्ये मराठा एकजुटीचा महाप्रलय आला आहे. आमच्या काहींनी खोटा डाग लावला आहे. निष्पाप पोरांना अडकण्याचे षडयंत्र सरकारने केले आहे. सरकार झोपू नका, मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. मराठा शांततेत मैदानात आला आहे, असे ते म्हणाले. शांततेत असणाऱ्या मराठ्यांना डाग लावला. शांततेत असलेल्या मराठ्यांना जाळपोळीचा खोटा डाग लावला. निष्पाप मराठा बांधवांवर गुन्हे दाखल केले. आपल्याला डाग लावला. काही ना काही करुन निष्पाप पोरांना गुंतवण्याचे षडयंत्र सरकारने केले. मराठ्यांना काही करायचे तर आज केले असते.
बीडमधील सभेतून मनोज जरांगे- पाटलांनी छगन भुजबळांवर टीका केली होती. आता या टीकेला भुजबळांनी उत्तर दिले. “सभेमधील अर्धे भाषण भुजबळांवर होते. बाकी लेकरं बाळं असं नेहमीचं होतं. काल चर्चा करताना त्यांनी सगेसोयरेंचा मुद्दा घेतलाच नाही,” असे ते म्हणाले. तसेच मराठ्याच्या वाट्याला गेलात तर काय होतं ते लक्षात ठेवा असं म्हणतात, मग बीडमधील जाळपोळ केल्याची अप्रत्यक्ष कबूली आहे का?, असा प्रश्न भुजबळांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदान आणि शिवाजी पार्कवर 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. सरकारला कोणतेही सहकार्य करायचे नाही, जर कोणत्याही मुलाला अटक केली तर आपण थेट पोलीस स्टेशन समोर जाऊन मांडी घालून बसायचे आहे. तर कोणीही जाळपोळ करायची नाही. मुंबईत जाताना कुठेही हिंसा करायची नाही, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगेंनी बीडमधील सभेच्या सुरुवातीला नाव न घेता छगन भुजबळांवर खालच्या शब्दांत टीका केली. सरकार सारखे त्यांचे ऐकत आहे. भुजबळांना कोणी मंत्री केले काय माहित?, आरक्षण मिळू दे, मग कचका दाखवतो, असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला आहे. आम्ही गप्प बसलो, की तो काड्या करतो. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
○ ‘क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली’
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे, अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे. ‘क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे. येत्या 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे. याच अर्थ असा होतो की, क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारले नसून, ते स्वीकारले आहे,’ असे पाटील म्हणाले.