○ मविआमध्ये जाणार? बच्चू कडू म्हणाले…
अमरावती : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. कडूंचे मुळ गाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कुरळपुर्णात दोघांची भेट झाली. Sharad Pawar met Bachu Kadu, Pawar’s spontaneous reception Amravati Mahavikas Aghadi यावेळी कडूंनी शरद पवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. कडूंनी चहापाण्याचे निमंत्रण दिले होते, त्यांच्या आग्रहामुळे आपण भेट घेतल्याची माहिती यावेळी शरद पवार भेटीनंतर दिली आहे. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.
जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत आम्ही सोबत आहोत, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरण आमदार बच्चू कडूंनी दिले. अचलपूरमधील फिनले मिलमध्ये शरद पवारांचे मोठे योगदान आहे, मदतीची जाणीव म्हणून भेटीला बोलावले, असेही यावेळी बोलताना कडू म्हणाले. दरम्यान शरद पवारांना कडूंनी भेटीचे निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात कडू महाविकास आघाडीमध्ये जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते.
राजकीय संबंधातील कटुता दूर करण्यासाठी प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांच्या गोड चहाचा पाहुणचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गुरुवारी (ता. 28) चांगलाच भावला. अमरावती येथील आपल्या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी आज बच्चू कडू यांची त्यांचे मूळ गाव असलेल्या कुरळपुर्णात येथे जात त्यांची भेट घेतली.
अमरावती येथून दर्यापूरला जाताना शरद पवार हे सकाळी साडेनऊच्या सुमारासच आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी दाखल झालेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी आमदार कडू यांनी शरद पवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शरद पवार येणार असल्याने कुरळपुर्णात त्यांच्या स्वागताचे फलक उभारण्यात आले होते. आमदार बच्चू कडू यांनी आपल्याला चहापाण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या आग्रहामुळे आपण ही भेट घेतल्याची माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली. भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. बच्चू कडू यांच्या निवासस्थानी त्यांचे कुटुंबीय आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
बच्चू कडू या भेटीबाबत म्हणाले की, सामाजिक आणि कृषी संदर्भात चर्चा झाली. आमच्या चर्चेत कोणतीही राजकीय मुद्दे नव्हते. आम्ही पवारांना सांगितले की, पेरणी ते कापणीपर्यंतती सगळी कामे ‘एमआरईजीएस’मध्ये घेतली गेली पाहिजे. पवारांची राजकीय भेट नव्हती. मदतीची जाणीव म्हणूनच त्यांना निमंत्रण दिले होते. पवारांच्या पुढाकारातून फिनले मिल आली होती. तशाच स्वरूपाची मदत मिळावी, अशी विनंती त्यांना केली. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी, हीच आमच्या दोघांची इच्छा होती. राजकीय विषयांवर काही चर्चा झाली असती तर पवार आणि आपण दोघांनीही ते जाहीरपणे सांगितले असते, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमधून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यामागचे कारणही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. दिव्यांगांच्या कल्याणासाठी, घरकुलांसाठी, मतदारसंघातील कामांसाठी मी शिंदे यांच्यासोबत गेलो. लोक त्याला गद्दारी म्हणत असतील तर मी त्याचे स्वागत करतो, असे आमदार बच्चू कडू म्हणाले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. तरीही कामे होत नव्हती, असे त्यांचे म्हणणे होते.