मुंबई : आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज 20 जानेवारीला भव्य मोर्चाला सुरूवात करणार आहे. तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण नको या मागणीसाठी ओबीसी समाजही 20 जानेवारीला राज्यभरात आंदोलने करणार आहेत. Maratha, OBC protest on the same day ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आमचे हे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून सरकार विरोधात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा आणि ओबीसी समाज आपल्या विविध मागण्यांसाठी आणि गेल्या अनेक वर्षांच्या समस्या घेऊन लाखोंच्या संख्येने पुन्हा एकदा मुंबईत एल्गार घेऊन येणार आहेत. त्यामुळे हे मुंबईला आणि राज्य सरकारला परवडणार नाही. तसेच सरकार आता या दोन्ही समाजाला सरकार कसं सांभाळून घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईत 20 जानेवारीला मराठा आरक्षणासाठी भव्य आंदोलन करणार असे आंदोलक मनोज जरांगे यांनी जाहीर केले होते. याबरोबरच आता ओबीसी जनमोर्चानेही आपल्या विविध मागणीसाठी 20 जानेवारीलाच आंदोलन पुकारले आहे. या दोन्ही मोर्चाच्या तयारी मुंबईत जोरदार पद्धतीने सुरू आहे. मात्र दोन्ही समाज आमने-सामने आल्यास संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही समाजाचे मोर्चे सरकार कसे सांभाळून घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगेंची माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भेट घेतली होती. त्यांनी जरांगेंना मराठा समाजाचा ओबीसी समाजात सामावेश झाल्यास 27 टक्के आरक्षणाची तीन भागात फोड करत मराठा समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत 9 टक्क्यांचा फॉर्म्युला सांगितला होता. पण हा फॉर्म्युला जरांगेंनी नाकारला. यामुळे फक्त अर्ध्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल. बाकीच्या मराठा समाजाला मी अंगावर घेऊ का?, असा प्रश्न जरांगेंनी केला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस कोणाच्या सभेला परवानगी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही थांबता थांबेना. त्यात आता मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीपासून आंदोलनाची हाक दिलीये. 20 जानेवारी पासून सुरु होणारे हे आंदोलन पुढे मुंबईत एकत्र होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा शिष्टमंडळ,सकल मराठा समाज आणि संघटना यांच्याकडून सध्या मुंबईत तयारी करण्याच काम सुरू आहे. याबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत शिवाजी मंदिर येथील राजश्री शाहू सभागृहात पार पडली.
मराठा समाज आपल्या आंदोलनाची मुंबईत जोरदार तयारी करत असताना दुसरीकडे ओबीसी जनमोर्चाने देखील जातीय जनगणना, ओबीसींना मराठ्यातून आरक्षण देऊ नये आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत आपली आंदोलनाची तयारी सुरु केलीये. ओबीसी जनमोर्चाने मुंबईत आझाद मैदानात आपल्याला परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील आझाद मैदान पोलिसांना पत्र लिहिले आहे. तर याच मैदानात मराठा शिष्टमंडळाने देखील आपल्या आंदोलनासाठी पाहणी केलीये आणि ते देखील या आझाद मैदानासाठी आग्रही आहेत.
मनोज जरांगे हे मराठा समाजाला घेऊन ओबीसीन मधून सरसकट मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी आग्रही असून दुसरीकडे ओबीसी समाज मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये तसेच जातीय जनगणना व्हावी या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात येईल. त्यासाठी दोन्ही समाज समन्वयक तयारी करत असताना एका मैदानासाठी आग्रही आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस नक्की कोणाला कुठे आंदोलनाची परवानगी देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आंदोलनापूर्वी आणि आंदोलनानंतर हा राज्यात दोन्ही समाजांमध्ये आणि राज्य सरकारशी तसेच पोलीसांशी परवानगीवरून असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे.