पंढरपूर : श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे गुन्हा दाखल झाल्यापासून दिसत नाहीत. गेल्या अडीच महिने त्यांनी महाविद्यालयात पाऊल ठेवले नाही. Sant Damaji Sansthan employees on hunger strike दरम्यान पगार न झाल्याने संस्थेतील कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे.
दरम्यान महाविद्यालयामध्ये विना अनुदानित तत्वावर शास्त्र महाविद्यालय चालवले जाते. याशिवाय इतर विनाअनुदानित कोर्सेस चालवले जात आहेत. या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक, सहशिक्षक, लिपिक, शिपाई या सर्वांचे गेली तीन महिने झाले पगार झाले नाहीत. प्रशासनाधिकाऱ्यांनी पगार केले नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पगार तत्काळ करण्यात यावेत अशी मागणी संस्थेचे राहिलेले एकमेव सचिव अॅड. रमेश जोशी यांनी केली आहे. संस्थेचे सचिव रमेश जोशी व संचालक डॉ. अशोक सुरवसे यांच्या बोगस सह्या करून धर्मादाय आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्याकडे बदल अहवाल सादर करण्यात आला.
यामुळे मंगळवेढा पोलीस ठाण्यात रमेश जोशी व अशोक सुरवसे यांनी फिर्याद दाखल केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यामध्ये राहुल शहा, बाबासाहेब पाटील यांना तात्पुरता जामीन न्यायालयाने दिलेला आहे मात्र न्यायालयीन वाद पोलीस कोर्टकचेरी यामध्ये विनाअनुदानित असलेल्या प्राध्यापक कर्मचारी यांचे वेतन विनाकारण अडवून ठेवण्यात आले आहे. यामुळे कर्मचारी व शिक्षक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्राध्यापकांची सुटा संघटना याबाबत मूग गिळून गप्प आहे.
सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र व कला महाविद्यालय या ठिकाणी प्राध्यापकांचे व कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत म्हणून सुटा संघटनेच्या वतीने ३२ दिवस महाविद्यालयाच्या दारात धरणे आंदोलन केले होते मात्र ही आंदोलन करणारी सुटा संघटना दामाजी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पगारासाठी मूग गिळून गप्प बसली आहे.
एकेकाळी प्राध्यापकांच्या पगारासाठी वेतनासाठी संस्थेला वेठीस धरणारे सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात सुटा संघटनेच्या माध्यमातून भीती निर्माण करणारे नेते आता प्राचार्य प्राध्यापक सोलापूर विद्यापीठात व्यवस्थापन समितीवर सदस्य झाले असल्यामुळे प्रशासक म्हणून कार्यरत असल्यामुळे प्राध्यापकांवर होणाऱ्या अन्याबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्यामुळे त्यांच्याबद्दल उलट सुलट चर्चा होत आहे. त्यांच्या हेतूबद्दल शंका घेतली जात आहे.