मुंबई : माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला आज सोडचीठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधले. Big blow to Congress, Milind Devar’s entry into Shiv Sena Shinde group, CM Shinde praised यावेळी शिंदे गटाचे अनेक नेते उपस्थित होते. तसेच यावेळी देवरा समर्थकांनीही मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश केला. यात माजी नगरसेवक सुनील नरसाळे यांचा समावेश आहे.
काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी व कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे, असे त्यांनी ट्वीट केले. मुंबई- शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरांनी भाषण केले. यात बोलताना “मी काँग्रेस सोडेन असे कधीच वाटले नव्हते. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस सोबत असलेले 55 वर्षाचे जुने नाते संपवीत आहे. माझे राजकारण मीच विकासाचे राजकारण राहिले आहे. माझी विचारधारा सामान्य लोकांची सेवा करणे हेच आहे,” असे त्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जमिनीवरचे नेते आहेत, असे म्हणत देवरांनी कौतुक केले.
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात बोलताना शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरांच्या काँग्रेस पक्ष सोडण्याच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले. तसेच मी डॉक्टर नसताना दीड वर्षांपूर्वी असंच ऑपरेशन केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. असे म्हणत अनेकजण शिवसेना शिंदे गटात येणार असल्याचे सांगितले. या व्यतिरिक्त मी दीड वर्षात एकदाही सुट्टी घेतली नसल्याचे शिंदे म्हणाले.
काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते 2004 आणि 2009 साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले. 55 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाचे काँग्रेसशी संबंध आहेत. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे 4 वेळा दक्षिण मुंबईतून खासदार होते. त्यामुळे मुंबई व दिल्लीच्या राजकारणात देवरा यांचे वजन आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. यातच आता राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मिलींद देवरा हे सपत्नीक सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. ‘मी विकासाच्या मार्गावर जात आहे’, असं मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.
मिलिंद देवरांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाडांनी प्रतिक्रिया दिली. ‘मिलिंद देवरा यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस परिवारासोबत देवरा कुटुंबिय हे अनेक वर्षांपासून निष्ठेने जोडलेले होते. हे पाऊल टाकू नये यासाठी आम्ही सर्वांनी शर्थीने प्रयत्न केले. पक्ष नेतृत्वाने पण त्यांची मनधरणी केली,” असे त्या म्हणाल्या.
मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडून लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू आहे. अखेर आज सकाळीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासी असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे असे देवरा यांनी म्हटलंय. आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे असलेले ५५ वर्षांचे नाते संपुष्टात आणले. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे, अशी पोस्ट देवरा यांनी एक्सवर केली आहे.