○ मोदींना सोलापुरात केलेल्या घोषणेची आडम मास्तरांनी करुन दिली आठवण
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात आज अश्रू तरळले. सोलापुरातल्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण करताना मोदी भावूक झाले होते. Modi emotional in Solapur: Narendra Modi inaugurated 15 thousand houses Narasaiya Adam हजारो लोकांना आज या प्रकल्पांतर्गत घरे दिली जाणार आहेत. ‘असेच घर मला लहानपणी राहायला मिळाले असते तर….’ असे म्हणत मोदींचा कंठ दाटून आला. दरम्यान हजारो लोकांचे घराचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याने मला आनंद होत असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सोलापुरात आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे लोकार्पण झाले. या प्रकल्पाचे भूमीपूजन 2019 मध्ये मोदींनी केले होते. त्यातील पहिल्या टप्यातील 15 हजार घरांचे लोकार्पण आज झाले. तर दुसऱ्या टप्यातील 15 हजार घरांचे काम अजून सुरु आहे. तब्बल 365 एकरमध्ये उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये 834 इमारती आहेत. यामध्ये 1 BHK चे 30 हजार फ्लॅट आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातल्या कुंभारी येथे साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील 15 हजार घरांचे लोकार्पण केले. यावेळी मोदी यांनी काही नागरिकांना घरांच्या चाव्या दिल्या. यासह पंतप्रधानांनी पंतप्रधान स्वानिधी योजनेतील नागरिकांनाही कर्जाचे वाटप केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचे कौतूक केले. यावेळी, दावोस दौऱ्यावेळी अनेक देशांचे प्रमुख नेते भेटले. त्या सर्वांच्या तोंडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव होते, अशी माहिती शिंदे यांनी माहिती दिली. मोदींच्या हाती यश आहे, बोले तैसा चाले.त्याची वंदावी पाऊले ही म्हण मोदींसाठी लागू होते, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. ते सोलापुरात दुपारी दाखल झाले. त्यांच्या हस्ते सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील 15 हजार घरांचे लोकार्पण झाले. येथील सूतगिरणी कामगारांसह नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येथील कार्यक्रम झाल्यानंतर मोदी हे बंगळुरूकडे रवाना झाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, म्हणाले, मी पाच वर्षांपूर्वी उद्घाटनासाठी आलो होतो, त्यावेळी आडममास्तरांची जाडी कमी होती. आता पाहतो तर काय, आडममास्तर हे फळे खाऊन जाड झालेले दिसत आहेत. मात्र त्यांनी केलेल्या कष्टाच्या यशाची फळे चाखल्यामुळे त्यांच्या तब्येतीत ही सुधारणा झाली आणि हा परिणामदेखील मोदींच्या गॅरंटीमुळे दिसून आला,’ अशी भावनाही मोदींनी व्यक्त केली.
रे-नगरचे प्रवर्तक कॉम्रेड आडममास्तर यांच्या तब्येतीवरही मोदींच्या गॅरंटीचा परिणाम झाल्याचा मार्मिक टोला लगावला. फळे खाऊन खाऊन आडममास्तरांची जाडी वाढली आहे. मात्र ही यशाची फळे असल्याचे सांगत मोदी यांनी आडममास्तरांच्या कार्याचे कौतुकही केले. माकपचे नेते आडममास्तर यांच्या दूरदृष्टीतून आणि संघर्षातून सोलापूरमध्ये असंघटित कामगारांसाठी 30 हजार घरांचा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पातील 15 हजार घरांचे मोदींच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्तेच या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. त्याची आठवण करून देताना मोदींनी आडममास्तर यांच्या तब्येतीकडे लक्ष वेधले.
माजी आमदार नरसय्या आडम यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक कमी करीत थेट मागण्यांना हात घातला. पंतप्रधान मोदींनी कामगारांचा हा गृह प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करीत अजराअमर काम केले. मात्र, देशभरात महिन्याला पाच हजार असंघटित कामगारांचे मृत्यू होत आहेत. अशा कामगारांना महिन्याला किमान 10 हजार रुपये निवृत्तिवेतन मिळावे.
घरांसाठी मिळणाऱ्या सबसिडीमध्ये वाढ करावी, अशी मागणी केली. केंद्राने लावलेला 1 टक्के लेबर सेस कमी करावा, अशीही विनंती त्यांनी केली. तसेच मोदींनी लष्कराचे ड्रेस सोलापुरातून घेण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले? असा सवाल करीत त्यांना त्यांच्या घोषणेची आठवण करून दिली. त्यामुळे आम्हाला ऑर्डर द्या, एक लाख रोजगारनिर्मिती होईल, असे आवाहनही त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केला.
● उद्धव ठाकरेंचा केला उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर असून यावेळी आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी मोदींसमोर बोलताना आडम मास्तरांकडून चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख झाला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी तत्काळ माफी मागत चूक सुधारली.