Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: यावर्षी दोन हजाराची एकही नोट छापली नाही; नोट बंद होणार का ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

यावर्षी दोन हजाराची एकही नोट छापली नाही; नोट बंद होणार का ?

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 2:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकने 2019-20 मध्ये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केली नाही. यादरम्यान दोन हजारांच्या नोटांचा चलनातील वापर कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या 2019-20 च्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येणा-या काळात दोन हजाराची नोट बंद होणार का, याबाबत सवाल उपस्थित झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या अहवालानुसार, मार्च, 2018 च्या अखेरीस चलनात असेलल्या 2000 रुपयांच्या नोटांची संख्या 33, 632 लाख होती, मात्र मार्च, 2019 च्या अखेरपर्यंत त्यात घट होऊन 32, 910 लाखांवर आली. मार्च, 2020 च्या अखेरीस चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या आणखी कमी होऊन 27, 398 लाखांवर आली.

चलनातील एकूण नोटांमध्ये मार्च 2020 च्या अखेरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटांचा वाटा 2.4 टक्के राहिला. मार्च 2019 च्या अखेरीस हा वाटा 3 टक्के तर मार्च 2018 च्या अखेरपर्यंत 3.3 टक्के होता, असंही आरबीआयच्या अहवालात म्हटलं आहे.

*2000 रुपयांच्या नोटांचा वाटा घटला

मूल्याच्या हिशेबानेही 2000 रुपयांच्या नोटाचा वाटा घटला आहे. आकडेवारीनुसार मार्च, 2020 पर्यंत चलनातील एकूण नोटांच्या मूल्यामध्ये 2 हजार रुपयांचा नोटांच्या वाट्यात घट होऊन 22.6 टक्के राहिला आहे. मार्च, 2019 च्या अखेरीस 31.2 टक्के आणि मार्च, 2018 च्या अखेरीस 37.3 टक्के होता.

* 2019-20 मध्ये दोन हजारांच्या नोटांची छपाई नाही

अहवालात म्हटलं आहे की, “2019-20 मध्ये दोन हजारांच्या नोटांच्या छपाईसाठी कोणतीही ऑर्डर दिलेली नाही. भारतीय रिझर्व्ह बँक नोट प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड तसंच सिक्युरिटी प्रिटिंग अँड मींटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून दोन हजारांच्या नोटांची कोणतीही नवी पूर्तता झालेली नाही. 2019-20 मध्ये बँक नोटांची ऑर्डर मागील एक वर्षाच्या तुलनेत 13.1 टक्के कमी होती.

* या नोटांमध्ये वाढ

2018 पासून तीन वर्षांत 500 आणि 200 रुपयांच्या नोटांच्या चलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे. मूल्य आणि प्रमाण या दोन्हीच्या बाबतीत 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचं चनल वाढलं आहे, असं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #नोटा #दोनहजार #2000 #छपाई #नोटबंदी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काहीही झाले तरी माझा पाठिंबा भारतालाच; लग्नापूर्वीच सानियाने शोएबशी केलंय स्पष्ट
Next Article मुंबईपाठोपाठ सांगलीचा मृत्यूदर सर्वाधिक; 24 दिवसात 267 कोरोनाबळी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?