सोलापूर: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल केव्हा लागणार या संदर्भातली प्रतीक्षा आता संपणार आहे. तिच्या सोमवारी 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी संभाजीनगरमध्ये ही माहिती दिली आहे.
बारावी बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर दहावीचा निकाल केव्हा लागणार? या संदर्भात प्रचंड मोठी उत्सुकता होती. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठीची ही उत्सुकता आता फार काळ राहणार नाही.
27 तारखेला दुपारी निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका प्रिंट द्वारे घेता येईल. जी पुढील संदर्भासाठी वापरता येईल. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.