वेळापूर प्रतिनिधी
माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्यांची कामे, रस्त्यांना निधी देण्याबाबत, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेती चे निरा कालव्याच्या उन्हाळी हंगामाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याबाबत प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न राहील असे प्रतिपादन माढा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले ते तांदुळवाडी तालुका माळशिरस येथे अॅड. विजय पवार मित्रपरिवार यांच्या वतीने खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तांदुळवाडी ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सहा जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तांदुळवाडी ग्रामपंचायत येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात अॅड. विजय पवार मित्रपरिवार यांच्यावतीने धैर्यशील मोहिते पाटील यांचा फेटा बांधून व मोठा हार घालून सन्मान करण्यात आला. तसेच विविध संघटनांच्या वतीने ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना अॅड. विजय पवार म्हणाले की तांदुळवाडी गावाच्या विकासासाठी मोहिते पाटीलांचे मोठे योगदान आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तोंडले तांदुळवाडी फळवणी या रोडसाठी निधी मंजूर करावा, त्याचबरोबर निरा कालव्यावरील शेतकऱ्यांची पिके प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पाणी न मिळाल्याने जळून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे यासाठी पाण्याच्या दोन पाळ्या मंजूर करून मिळाव्यात यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये आरक्षणावर बोलण्यासाठी मी तयारी केली होती. पण मला बोलण्याची संधी मिळाली नाही पण ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या अधिवेशनात मी बोलणार आहे.आरक्षणा बाबत आनेक तज्ञांचा सल्ला घेतला आहे येत्या अधिवेशनात बोलणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की मला इच्छा असतानाही पदे मिळाली नाहीत, पण कार्यकर्त्यांची मागणी व जनतेचे आशीर्वाद यातून मला खासदारी सह अनेक पदे मिळाली असल्याचे आवर्जून त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला अॅड विजय पवार, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अॅड. नागेशराव काकडे, तांदुळवाडी उपसरपंच सतीश कदम, माजी उपसरपंच शशिकांत कदम, श्रीकांत देशमुख, अण्णासाहेब मगर, जगन्नाथ शिंदे, दत्ता मगर, दत्तात्रय अवताडे, विश्वनाथ मगर, तुकाराम अवताडे पाटील, नागनाथ दुपडे, महेश नलावडे, अरविंद जाधव, महेश काळे, दादासाहेब शिंगाडे, धनंजय दुपडे, भुजंगराव शिंगाडे, श्रीकांत आवताडे, संग्राम अवताडे अशोक आसबे, प्रसाद दुपडे, पंकज अवताडे, विजय शिंदे, दत्तात्रय मगर आदी. मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्जेराव चव्हाण, विश्वजीत दुधाट, रवी दुधाट,अजीत कदम,तानाजी कदम, रणजीत पवार,वृषभ आसबे,माधव उघडे,बबलु पारवे, हर्षवर्धन तनपुरे अरिफ मुलाणी,शुभम बांदल,अदित्य दुधाट,समाधान कदम,गणेश उघडे,बापू राजगुडे,शहाजी निलटे,विश्वजीत कदम,अवधूत चव्हाण,माऊली सुरवसे,पप्पू दुधाट, विलास कदम शुभम बांदल, या सह आनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परीक्षण घेतले.