अक्कलकोट :- (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे सुरू असलेले अन्नदान सेवा, नियोजित महाप्रसाद गृह, पार्किंगची व्यवस्था आणि येणाऱ्या भाविकांसाठी न्यासाचे पुढील मास्टर प्लॅन देखील अतिशय सुनियोजित असल्याचे मनोगत सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, चिदानंद उपद्य, पीएसआय खापरे हे उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, निखील पाटील, गोटू माने, प्रवीण घाडगे,एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, अभियंता अमित थोरात, बाळासाहेब पोळ, सुरज सावंत, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.